Kolhapur News : फेब्रुवारी महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी 6 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात (Kolhapur News) छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत लोकशाही दिन आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे. तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/महानगरपालिका स्तरावरील प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तरावरील प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार आणि मंत्रालय स्तरावरील प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.
लोकशाही दिनात अर्ज स्वीकृतीचे निकष
- अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी.
- चारही स्तरावरील लोकशाही दिनांकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक.
- तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल.
- जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात आणि विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल.
न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे आम त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अशा प्रकारचे अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत.
जिल्हा परिषदेची अनुकंपा तत्वावर नियुक्तीची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा परिषदेत (Kolhapur ZP) गट क व गट ड मधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा योजनेखाली नोकरी मिळण्यासाठी केलेल्या अर्जांची सन 2022 अखेरची संभाव्य ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेने तयार केली आहे. यामध्ये उमेदवारांचे जानेवारी ते डिसेंबर 2022 अखेर एकूण 44 व त्यापूर्वीचे एकूण 95 असे एकूण 139 उमेदवारांचे अर्ज सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूरकडे नियुक्तीकरता प्रलंबित आहेत. ही यादी जिल्हा परिषदेच्या www.zpkolhapur.gov.in या संकेतस्थळावर 1 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनिषा देसाई यांनी दिली आहे.
या यादीमध्ये पूर्ण अर्ज, अपूर्ण अर्ज व निकाली काढलेले अर्ज असे स्वतंत्रपणे दर्शविण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज सादर केले आहेत, त्यांची नावे ज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ट केली आहेत. या यादीवर काही हरकती, दुरुस्ती असल्यास तसेच ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, अशांनी या बाबतची पूर्तता 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे समक्ष उपस्थित राहून करायची आहे. मुदतीनंतर आलेल्या हरकती, दुरुस्ती यांचा विचार केला जाणार नाही, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) देसाई यांनी कळवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या