Raju shetti : दडपशाही करुन जर प्रकल्प उभा करत असाल, तर उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी (Raju Shetti) दिला. रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल, तर हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. शेवटी जमीन देणं न देणं हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 


मुख्यमंत्र्यांना महागात पडेल...


कोणाची तरी सुपरी घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. बारसू प्रकल्पाला स्थानिकांनी मोठा विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ न देण्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. सकाळी आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर राजू शेट्टींनी देखील आक्रमक पवित्रा घेत स्थानिकांची बाजू मांडली आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महागात पडेल असेही शेट्टी म्हणाले.


दडपशाही करुन जर प्रकल्प उभा करत असाल तर उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करणार असल्याचा इशारा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी (Raju shetti) दिला. रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. शेवटी जमीन देणं न देणं हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 


विरोध असताना प्रकल्प करण्याचा घाट कशासाठी? 


रिफायनरी प्रकल्पाला कोकणातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. तरीसुद्धा हा प्रकल्प करण्याचा घाट का घातला जात आहे. महिला पुरुष घर दार सोडून रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवण्याचा घाट का घातला जातोय. पोलिसांना एवढा का इंटरेस्ट आहे असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केला. तुमचा कारभार पारदर्शक आहे, तर तुम्ही समोर कारवाई करायला पाहिजे होती असे शेट्टी पोलिसांना उद्देशून म्हणाले. तुम्ही कोणाची सुपारी घेतली आहे? असा सवाल शेट्टींनी उपस्थित केला.


इतर महत्वाच्या बातम्या