Hasan Mushrif on Kagal Nagar Palika: कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर कोल्हापूरमध्ये एकच राजकीय खळबळ उडाली. दरम्यान, आता कागल नगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटप झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रचारामध्ये आता हसन मुश्रीफ यांनी अजितदादा पवार स्टाईलने मतदारांना धमकी वजा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. मुश्रीफ यांनी ज्या वाॅर्डमध्ये मते कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवा, आपलं काही खरं नाही अशा शब्दात धमकी वजा इशारा दिला. कोणीही निगेटिव्ह चर्चा केली आणि तसं कळलं तर त्यांचे खैर केली जाणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.
तुमच्या घरात सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का?
हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की उमेदवार बाहेरच्या वाॅर्डातील आहे म्हणून कोणी दुर्लक्ष करू नका. घराजवळचा उमेदवार आहे म्हणून तुमच्या घरात सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? अशी सुद्धा विचारणा हसन मुश्रीफ यांनी यावेळी केली. ते म्हणाले की नेतेमंडळी ज्यावेळी एकत्र येण्याचा निर्णय घेतात त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी करायची असते. नेत्यांनी घेतलेला निर्णय पटो किंवा न पटो, पण मान्य करायचा असतो असं सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ते पुढे म्हणाले की आता समरजितसिंह साहेब आपल्या सोबत असल्यामुळे माझ्या धमकीला मर्यादा येणार आहेत. दोघे भांडत बसलो तर आपलं महत्त्व राहिलं असतं आपल्याला पैसे मिळाले असते, कुणीतरी विचारलं असतं, म्हणून काही लोक गमजा करत करतील असेही ते म्हणाले.
मंत्र्याची अब्रू राखायची की घालवायची हे तुमच्या हातात
त्यांनी सांगितले की कागल मध्ये दोन-तीन वाॅर्डात परिस्थिती टाईट करण्याची गरज आहे. दोन गट एकत्र आले आहेत. त्यामुळे राज्यभर याची चर्चा होणार आहे. राजेंची तर होईलच, पण मी मंत्री असल्यामुळे माझी जास्त चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्र्याची अब्रू राखायची की घालवायची हे तुमच्या हातात आहे. आमच्या दारात निवडणुकीचे इतकं मोठं लागलंय की कार्यकर्त्यांची लग्नाला जायला वेळ मिळत नाही. कार्यकर्त्यांनी नंतर गोंधळाला बोलावं, जेवायला नक्की येईन असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आमच्या युतीची बातमी आधीच फुटल्याने त्यामुळे जादा फॉर्म राहिले. गमजा करणारे गमजा करून जातील. मात्र, तुमचे भविष्य संकटात येणार असल्याचा इशारा सुद्धा हसन मुश्रीफ यांनी दिला. ते म्हणाले की आता सैनिकासारखं काम करा, कोणी बोलवून तंबी द्यायला लावू नका, सांगायला लावू नका असेही सांगन रिकामे झाले.
इतर महत्वाच्या बातम्या