मुरगुड : राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी आज (रविवारी, ता २१) सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली आहे, दुपारपर्यंत विजयाचा गुलाल उधळला जाईल. काही ठिकाणी मतमोजणीचे कौल समोर येऊ लागले आहेत. मुरगुड नगरपालिकामध्ये मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक पाच अ मधून भाजप शिवसेनेच्या उमेदवाराने पराभव केला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मंडलिक गट सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कोल्हापुरात भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी झाला आहे. चंदगड नगरपंचायतीमध्ये सुनील कावनेकर यांचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कावनेकर यांच्या प्रचारासाठी आले होते.
मुरगुड नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा
मुरगुड नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर सेनेच्या नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळाला आहे. हसन मुश्रीफ समरजित घाटगे यांना मुरगुडमध्ये धक्का बसला आहे, हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांना धक्का मुरगुडमध्ये धक्का बसला आहे, मुरगुड नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ 4 जागांवर विजय झाला आहे.
खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना धक्का
साताऱ्यामध्ये पहिलाच निकाल धक्कादायक निकाल समोर आला आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना प्रभाग क्रमांक तीनमध्ये धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजयी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चेतन सोळंकी आणि रेणू येळगावकर यांचा पराभव झाला आहे. दोन्ही राजेंच्या बालेकिल्ल्यात अपक्षांची एंन्ट्री झाली आहे. साताऱ्यात अपक्ष उमेदवारांनी खाते खोलली आहेत, खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये अपक्ष उमेदवार शंकर किर्दत उदयनराजेंचे निष्ठावंत कार्यकर्ते विजयी झाले आहेत. राजेंच्या भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे.