Laxman Savadi Car Accident : कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी अपघातातून बचावले आहेत. त्यांच्या कार चालकाचा समोर आलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून कार कालव्यात पलटली. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नसून लक्ष्मण सवदी यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. 


अथणीहून बेळगावला जात असताना हा अपघात घडला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण सवदी घरी गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर अथणीहून बेळगांवकडे जात होते. हिडकल-हारुगेरी दरम्यान कारच्या आडव्या आलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला. ताबा सुटताच कार नजीकच्या घटप्रभा उजव्या कालव्यात उलटली. 


अपघातानंतर एअरबॅग ओपन झाल्याने चालक सनरुफमधून बाहेर पडला. कारमध्ये अडकलेल्या सवदी यांना परिसरातील नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याने हारुगेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी बेळगावला नेण्यात आले असून त्यांची प्रकृती ठिक आहे. त्यांच्या मुलाने याबाबत दुजोरा दिला आहे. 


अपघातानंतर वरिष्ठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या