Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी जरूर बारसूला जावं, कारण त्यांनीच बारसू याठिकाणी हा प्रकल्प व्हावा यासाठी मोदींना पत्र लिहिलं होतं, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. बारसूमध्ये भेट देणारच अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मात्र, त्यांनी येऊन दाखवावे, असे आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली आहे. दुसरीकडे, संजय राऊत हिंमत असेल, तर अडवून दाखवा, असल्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून भूमिका स्पष्ट केली. 


वज्रमूठ सभेवरून दीपक केसरकरांचा टोला


महाविकास आघाडीची आज (1 मे) बीकेसी वज्रमूठ सभा होत आहे. या सभेवरून दीपक केसरकरांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र दिनी नेहमी चांगले कार्यक्रम घ्यायचे असतात. आजच्या दिवशी तरी चांगले आणि सकारात्मक बोलले जाईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या हिताचे बोलले जाईल. महाराष्ट्राचा विकास थांबण्याबाबत वज्रमूठ असण्याऐवजी महाराष्ट्राच्या विकासाचं योगदान जनतेला देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील दोन लाख तरुणांच्या नोकऱ्या काढून घेताना आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल हे कुणी पाहत असेल तर हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. 


शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी


दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही तोफ डागली. आता तर लोकांची खात्री पटली आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवले आहेत, त्यांच्या विचारावरच आमचे मुख्यमंत्री चालत आहेत. जर राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती, असा दावाही त्यांनी केला. 


जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


केसरकर यांनी 2024 च्या निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असे सांगितले.  जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे तेच मुख्यमंत्री राहतील अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Kolhapur : सतेज पाटील, विनय कोरे, पी. एन. पाटलांना कार्यकर्ते, शेतकऱ्यांकडून 'जिव्हारी' लागणाऱ्या कानपिचक्या! नातलगांच्या उमेदवारीवरून टोचले कान