Kolhapur news : कोल्हापूर गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रम आणि वाद हे समीकरण होऊन गेलं आहे. याला कोल्हापूरची शान असलेला फुटबाॅल सुद्धा अपवाद राहिलेला नाही. आता कसबा बावड्यात (Kasba Bawda Kolhapur Lavani event) लावणीच्या कार्यक्रमात (Lavani performance) झालेली हाणामारी चर्चेचा विषय झाला आहे. कसबा बावड्यात लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात लावणी सादर करणाऱ्या नृत्यांगनाला गुलाब देण्याच्या कारणावरून हाणामारी झाली.
आवडीच्या गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह
कसबा बावड्यात (Kolhapur news) यात्रेच्या निमित्ताने लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहारदार गाण्यावर लावणी कार्यक्रम होत असल्याने महिला वर्गाची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यामुळे लावणीच्या कार्यक्रमात तरुणाई बेधुंद (Audience behavior) होऊ लागली. कार्यक्रम सुरु असतानाच लावणी सादर करणाऱ्या तरुणीने केलेल्या हावभावामुळे तरुणाई अधिकच बेभान झाली. यामध्येच काहींनी लावणी सादर करणाऱ्या तरुणीला गुलाब (Rose-giving incident) देण्याचा आणि आपल्या आवडीच्या गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह केला. यानंतर वादात ठिणगी पडली.
तरुणांना व्यासपीठाच्या मागे नेले आणि चांगलाच चोप दिला
विरोधी गटातील तरुणांनी संबंधित तरुणांना (Youth assaulted in Kasba Bawda Kolhapur Lavani event) व्यासपीठाच्या मागे नेले आणि चांगलाच चोप दिला. हा सगळा प्रकार सुरू असताना शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद पाडला.या लावणीच्या कार्यक्रमाला महिला वर्गाची देखील उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात होती. मात्र, झालेला वाद आणि हुल्लडबाजी यामुळे महिलांनी देखील नाराजी व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या