Kolhapur News: कोल्हापूरमध्ये अवघ्या सात वर्षाची चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र, संबंधित मुलीने आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टाळला. अत्याचाराचा प्रयत्न करणारा 28 वर्षीय नराधम विकास कांबळेला इस्पूर्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी आईसोबत एका नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती. यावेळी नराधम विकास कांबळेस सुद्धा होता. कोल्हापुरातील कात्यायनी ते गिरगाव दरम्यान रस्त्यावरील उसाच्या शेतात सात वर्षीय चिमुरडीला ओढून ऊसाच्या शेतात नेत अत्याचा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडिताने मोठ्याने आरडाओरडा केल्याने अनर्थ टळला. इस्पूर्ली पोलिसांनी आरोपी विकास कांबळेला ताब्यात घेतलं आहे.
गॅलरीतून खाली पडला, पण दैव बलवत्तर म्हणून वाचला
दरम्यान, चार दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील कोतोलीत प्रवीण पांडुरंग लव्हटे यांचा सव्वा वर्षाचा मुलगा श्रीवंश घराच्या गॅलरीत खेळत असताना बहिणीची नजर चुकवून खाली डोकावला अन् गॅलरीतून खाली पडला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून श्रीवंशच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली.लव्हटे यांची मुलगी कल्याणी गॅलरीत अभ्यास करत बसली होती. शेजारी श्रीवंश खेळत होता. यावेळी बाळ गॅलरी लगत ठेवलेल्या खुर्चीकडे गेले आणि त्यावर चढत असतानाच तोल जाऊन श्रीवंश खाली पडला. बाळ दिसेनासे होताच कल्याणी धावत बाहेर आली गॅलरीतून पडल्याचे दिसून येताच आरडाओरडा केला. कल्याणीच्या किंकाळीने बाजूचे लोक तत्काळ बाहेर आले. बाळ खाली पडताना पाहून दीपक परीट यांनी धावून जात श्रीवंशला झेलण्याचा प्रयत्न केला. पण झेल अपयशी ठरून श्रीवंश खाली गटारीवरील फरशीवर आदळला. मात्र डोक्यावर पडण्याऐवजी हातावर पडला अन् मोठी दुर्घटना टळली. त्याला दवाखान्यात नेल्यानंतर सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्या सर्व सामान्य कुटुबांचा जीव भांड्यात पडला.
इतर महत्वाच्या बातम्या