Hasan Mushrif on Kirit Somaiya : आमदार हसन मुश्रीफांवर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya in Kolhapur) यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या सोमय्यांनी  आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 500 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला. किरीट सोमय्या यांनी केडीसीसीमधून हसन मुश्रीफ यांनी नेमके किती बोगस कर्ज घेतलं आहे, याची माहिती द्यावी, असे आव्हान दिलं आहे. सात दिवसांची आम्ही मुदत देतो माहिती द्या, अन्यथा आम्ही ती देतो, असे सोमय्यांनी म्हटले आहे. 


नेमकं किती बोगस कर्ज घेतलं आहे?


सोमय्या यांनी पुढे सांगितले की, कर्जदारांची टॉप 25 नावे जाहीर करावीत. ऑडिटरची पण चौकशी सुरू आहे. शेतकऱ्यांसमोर बोलताना हसन मुश्रीफ यांना सोमय्यांनी आव्हान दिले. ते म्हणाले की, केडीसीसीमधून (KDCC ED Raid) हसन मुश्रीफ यांनी नेमके किती बोगस कर्ज घेतलं आहे याची माहिती द्यावी. 7 दिवसाची मुदत देतो, आकडा जाहीर तुम्ही करा, नाहीतर आम्ही जाहीर करतो. ईडीसह सगळे विभाग देखील चौकशी करत आहेत. मोदी, शहा म्हणतात बँक जिवंत राहणार, पण घोटाळाबाज यांना शिक्षा होणार. किरीट सोमय्या बोलताना पुढे म्हणाले की, अनेक शेतकरी मुबंईला भेटण्यासाठी येत होते. त्यामुळे मीच जावे असा विचार केला. शेतकरी, अधिकारी, संचालक भेटले. केडीसीसी मजबूत राहणार असून ठेवीदारांची रक्कम सुरक्षित राहणार आहे. एका व्यक्तीने घोटाळा केल्याने चौकशी लागली आहे तर ती बँकेची चौकशी नव्हे. जर चूका झाल्या तर त्या दुरुस्त केल्या जातील.


सध्या वेगवेगळ्या दिशेने तपास  


सोमय्या यांनी मुश्रीफांवरील ईडीच्या छापेमारीवर भाष्य करताना सांगितले की, हसन मुश्रीफ आणि परिवार, कंपन्यांवर धाडी टाकल्या होत्या. सध्या वेगवेगळ्या दिशेने त्याचा तपास जात आहे. ही बँकेची नव्हे, तर मुश्रीफ यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाशी आणि मित्रपरिवारशी संबधित आर्थिक व्यवहाराची ही चौकशी सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढे करून जर दंगा केला जात असेल तर चौकशी थांबत नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या