बेळगाव/कोल्हापूर : बेळगाव (Belgaon) जिल्ह्याच्या मुडलगी तालुक्यात शिवापूर गावातील सिद्धेश्वर मठाचे अडवी सिद्धराम स्वामी मठात रात्रीच्यावेळी महिलेसोबत रंगेहाथ सापडल्याने मोठा गोंधळ उडाला. स्वामीजींच्या रासलेली माहिती मिळताच गावकऱ्यांनी मठा धाव घेतली. यावेळी, संतप्त ग्रामस्थांनी मठातून स्वामींची हकालपट्टी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याने व मोठा गोंधळ उडाल्याने पोलिसांनी (Police) देखील मठाच्या घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, आपण कुठलेही चुकीचे काम केलं असून महिला तिच्या मुलीसह आली होती, रात्री उशीर झाल्याने ती मठात राहिली असे स्पष्टीकरण स्वामींनी दिले आहे.
विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी गावातील एक महिला आपल्या मुलीसमवेत मठात आली होती. रात्रीच्यावेळी मठात ही महिला स्वामींच्या खोलीत असल्याचे एका ग्रामस्थाने पाहिले आणि ही माहिती गावातील लोकांना दिली. गावातील लोक मोठ्या संख्येने मठात जमले आणि त्यांनी स्वामींना याबाबत जाब विचारला. त्यावेळी स्वामींनी आपण कोणतीही चूक केली नसल्याचे सांगितले. रात्री उशीर झाल्यामुळे महिला आणि मुलगी मठात मुक्कामाला राहिले होते, असा खुलासा स्वामीनी ग्रामस्थ्यांच्या समोर केला. मात्र, ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने धाव घेतल्यामुळे खोलीत असलेली महिला व तिची मुलगी घाबरल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी या महिलेचे व्हिडिओ काढले असून ती महिला आपल्या मुलीसमवेत याठिकाणी दिसून येते.
दरम्यान, ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी मठाकडे धाव घेतली. त्यानंतर महिला आणि तिच्या मुलीला सांत्वन केंद्रात हलविण्यात आले. दुसरे दिवशी सकाळी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वामी आणि ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांनी स्वामींना मठ सोडून जाण्यास सांगितले. तर, ग्रामस्थ्यांचा रोष पाहून अखेर स्वामी देखील मठातून बाहेर पडले. या घटनेचा सध्या जिल्ह्यात चर्चा असून सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
हेही वाचा
पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीरावांचे नाव द्या; भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी