Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाहुपूरी पोलिस ठाण्याचे पीएसआय गजानन परीट यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोरच धरणगुत्ती येथील संतोष राजू कांबळे याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. अनुकंपा का 1996 पासून होत नसल्याने आत्मदहनाचा मार्ग उचलल्याचा दावा त्याने केला.
दरम्यान 2007 पासून दाजी परशुराम कांबळे यांना अनुकंपा खाली नोकरी न दिल्याने तसेच अधिकारी भेटत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे परशुराम कांबळे आणि संतोष कांबळे यांनी पोलिसांना सांगितले. संतोषने आत्मदहनाचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे सुद्धा उपस्थित होते.
पीएसआय गजानन परीट यांनी तातडीने संतोषला पकडून तेथून बाहेर आणले. दररम्यान, शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरु केल्याची माहिती परीट यांनी दिली. चंद्रकांत पाटील आणि समरजजितसिंह घाटगे कागलमधील झोपडपट्टी रहिवाश्यांच्या प्रश्नासंदर्भात बैठकीसाठी आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या