Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाची सुमारे 200 कोटींची मालमत्ता 15 कोटींमध्ये खरेदी करत असल्याचा आरोप माजी नगरसेविका भारती पोवार यांनी केला आहे. महाडिकांनी या जागेच्या व्यवहारात  200 कोटींचा ढपला पाडल्याचा आरोपही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.


शाहूपूरी पोलिस आणि मनपा प्रशासनाकडून कायद्याला हरताळ फासत गुन्हेगारांना मदत होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. भ्रष्ट अध्यक्ष आणि संचालक मंडळावर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.  


माजी नगरसेविका भारती पोवार यांनी जागेच्या व्यवहारावरून अनेक गंभीर आरोप महाडिक कुटुंबीयांवर केले आहेत. संस्थेच्या जागेमध्ये चोरी तसेच इतर गुन्ह्यातील मोटारी तोडण्याचा अवैध व्यवसाय सुरु असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. संघाचे अध्यक्ष सुंदर देसाई यांना हाताशी धरून गांधी विचारांच्या संस्था उद्ध्वस्त केल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 


देसाई आणि महाडिकांच्या हस्तकाने वैयक्तिक फायद्यासाठी हळूहळू उद्योग व्यवसाय बंद करून सदरची जागा रिकामी पाडली. मात्र, या जागेचा घटनात्मक  कामांसाठी न करता अवैधरित्या वापर करून लाभ मिळवण्याचे प्रयत्न असल्याचेही भारती पोवार यांनी म्हटले आहे.  


महापालिकेच्या या जागेमध्ये सह हिस्सेदार असताना  मनपा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय चारी बाजूंनी पत्रे उभा करून अवैध बांधकाम केले आहे. तसेच संस्थेच्या जागेत 40 वर्षांपासून राहणाऱ्या मुर्तीकारांवर प्राणघातक हल्ला करून महामानवांच्या मुर्त्यांची तोडफोड केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. शाहुकालीन विहिर मुजवल्याचे त्यांनी म्हटले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या