कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या नावावर महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आता त्यांचे सुपुत्र माजी खासदार संभाजी राजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सुद्धा लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. आज (6 मार्च) त्यांनी कोल्हापूरमध्ये (Kollhapur News) पत्रकार परिषद घेत याविषयीची घोषणा करताना मोठ्या महाराजांसाठी 1000 टक्के बळ लावणार असल्याची घोषणा केली. त्यांचं संघटन असलेली स्वराज्य संघटना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले. 


संभाजीराजेंचा माघारीचा निर्णय आश्चर्यकारक 


यानंतर खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी संभाजीराजेंचा निर्णय म्हणजे आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गेले अनेक वर्ष स्वराज्यकडून निवडणुकीची तयारी सुरू होती. लोकसभा निवडणूक लढवणार असं सांगितलं जात होतं. संभाजीराजे आणि कार्यकर्ते सुद्धा तेच सांगत होते. त्यामुळे संभाजीराजे यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आश्चर्यकार्य निर्णय असू शकतो, असे ते म्हणाले. 


मोदी यांच्याच नव्हे तर कोणाच्याच वयाबद्दल बोलू नये


दरम्यान शाहू महाराजांच्या वयाचा मुद्दा काही लोकांकडून उपस्थित करण्यात आल्यानंतर संभाजी राजे यांनी आज कडक शब्दात प्रत्युत्तर देतानाच महाराजांचा वय हा मुद्दा असेल तर पंतप्रधान मोदी यांचे वय किती? अशी विचारणा केली होती. महाराज हे पैलवान आहेत, आजही त्यांचा प्रवास सुरु असतो असे सांगत वयाचा मुद्दा फेटाळून लावला होता. आता भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी संभाजीराजे यांना जोरदार प्रत्युत्तरद दिलं आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे वय काय आणि त्यांचे कार्य काय हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते एकही दिवस सुट्टी न घेता काम करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान हे मोदी यांच्याच नव्हे तर कोणाच्याच वयाबद्दल बोलू नये. मात्र मोदींच्या वयाबद्दल बोलू नये. सर्वांपेक्षा ते कार्यक्षम आहेत असे प्रत्युत्तर महाडिक यांनी संभाजी राजेंना दिले. 


काँग्रेसकडून महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब 


दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसने आपल्या पदरात पाडून घेतली आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज रिंगणात असतील, हे निश्चित आहे. त्यामुळे महायुतीकडून उमेदवार तोच राहिल्यास शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि शाहू महाराज यांच्यात लढत असेल. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या