Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून विश्रांती घेतल्याने पंचगंगेची नदी झपाट्याने उतरु लागली आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे काल रात्री बंद झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आता केवळ पायथा वीजगृहातून 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे आज सकाळी पंचगंगेची 10 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 40 फुट 10 इंच इतकी होती. त्यामुळे आज दिवसभरात पावसाची उघडीप राहिल्यास पंचगंगा इशारा  पातळीवरून खाली येण्याची शक्यता आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील अजूनही एकूण 61 पाण्यााखाली आहेत. पंचगंगा नदीवरील पाणीपातळी तासागणिक कमी होत चालली आहे. दरम्यान, सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस झाला असला, तरी प्रमाण अल्प असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यातील जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.


तुळशी धरणातून विसर्ग कमी केला


आज सकाळी सात वाजल्यापासून तुळशी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने  सध्या सुरु असलेला 900 क्यूसेक्स विसर्ग कमी करून तो 400 क्यूसेक्स इतका करण्यात आल्याची माहिती तुळशी धरण प्रशासनाने दिली आहे. 


कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. धरणाचा एकूण साठा 92.59 टीएमसी झाला आहे. त्यामुळे धरणात होणारी आवक लक्षात घेऊन आजपासून धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावरून साडेचार फुटांवर उचलले जाणार आहेत. त्यामुळे कोयना नदीपात्रात ३० हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.


खालील बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत



  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ

  • भोगावती नदी : हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव, तारळे, खडक कोगे 

  • कासारी नदी : वाघोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन, कुंभेवाडी 

  • कडवी नदी : सवते सावर्डे, शिरगांव, सरूड पाटणे, कोपार्डे

  • वेधगंगा नदी : कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव, शेळोली 

  • हिरण्यकेशी नदी : निलजी, ऐनापूर, गिजवणे, चांदेवाडी

  • वारणा नदी : चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, मांगले सावर्डे, चावरे, दानोळी 

  • दुधगंगा नदी : दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरबे, वाळवे

  • कुंभी नदी : शेणवडे, कळे, वेतवडे, मांडूकली

  • तुळशी नदी : बीड, आरे, बाचणी

  • ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड़, कोवाड, हल्लारवाडी, कोकरे

  • धामणी नदी : सुळे


इतर महत्वाच्या बातम्या