Aaditya Thackeray : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आहे.त्यांच्या शिवसंवाद यात्रेला बंडखोरांना धडकी भरावी, असा प्रतिसाद लाभला आहे.आज त्यांची बंडखोर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघात सभा होत आहे. 


कोल्हापूर ते सभेचे ठिकाण असलेल्या जयसिंगपूरमध्ये पोहोचण्यासाठी अवघ्या पाऊण तासाची वाट आहे. मात्र, ठिकठिकाणी नागरिकांकडून उस्फूर्तपणे झालेल्या स्वागताने त्यांना जयसिंगपूरमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल दीड तासांचा अवधी लागला. यावरून त्यांना मिळालेल्या प्रतिसादाची कल्पना येते. 


कोल्हापुरातून जयसिंगपूरकडे जात असताना प्रत्येक गावात आदित्य ठाकरे यांचे जोरदारपणे स्वागत करण्यात आले.आदित्य ठाकरे यांनी देखील आपला ताफा थांबवून तमाम शिवसैनिकांची तसेच नागरिकांची भेट घेतली. प्रत्येक पाच किलोमीटरवर गाडीतून उतरून ते नागरिकांचे पुष्पगुच्छ स्वीकारत होते. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याच्या दोन्ही बाजूला शेकडो दुचाकीस्वार हातात भगवा झेंडा घेऊन ताफ्यात सहभागी होत होते. त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एकप्रकारे इशाराच मिळाल्याचे बोलले जात आहे. 



जयसिंगपूरमध्ये पोहोचल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही रॅली नसून स्वागत असल्याचे ते म्हणाले.हा यड्रावकरांचा मतदारसंघ आहे असे विचारताच ते म्हणाले, की उल्हासदादांचा मतदारसंघ आहे ते यावेळी निवडून येतील असे आदित्य म्हणाले. 


उद्धव ठाकरेंना सर्वाधिक गरज असताना बंडखोरांनी पाठीत खंजीर खुपसला


आदित्य ठाकरे यांनी आज जयसिंगपूरमध्ये बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत कडाडून हल्ला चढवला. 40 बंडखोर तसेच 12 खासदारांवर त्यांनी घणाघाती हल्ला चढवला. गद्दारीचा डाग त्यांच्यावरील कधीही पुसला जाणार नाही असा प्रहार त्यांनी केला. 


जे गद्दार आमचे झाले नाही,ते तुमचे तरी होणार का?


ते पुढे म्हणाले की, जे गद्दार आमचे झाले नाही,ते तुमचे तरी होणार का? तुम्ही सत्तेसोबत राहणार की सत्यासोबत असा सवालही आदित्य यांनी शिवसैनिकांना केला. बंडखोर आमदारांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की,यांची गद्दारी आमच्या कानावर येत होती. मात्र,शपथ घेऊन हे आम्ही गद्दारी करणार नसल्याचे म्हणत होते.  मात्र, शेवटी त्यांनी जे करायचं तेच केलं.परंतु,राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं हे सिद्ध करायचं आहे म्हणून मी बाहेर पडलो आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या