कोल्हापूर : महाराष्ट्र कधी संपत नाही, महाराष्ट्र संपवतो, राज्य वेगळ्या मनस्थितीतून जात असून परिस्थिती भयंकर आहे. महाराष्ट्र नाॅट ओके झालाय आहे. महाराष्ट्रात चांगलं काही झालं नाही, रोजगार आहे तो काढून नेला जात असल्याची घणाघाती टीका शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्यातून प्रकल्प पळवापळवी होत असल्याने आदित्य ठाकरे यांनी तोफ डागली. 


तर 40 गद्दार अपात्र होईल


आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार गेलो तर 40 गद्दार अपात्र होतील. पण जर भाजपच्या संविधानाप्रमाणे गेले तर मग काय निर्णय येईल माहीत नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बाबासाहेब यांच्या संविधानाची बाजू घेऊन निर्णय घ्यावा, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.



गेला का महाराष्ट्र पुढे? 


आदित्य ठाकरे म्हणाले की, फाॅक्सकाॅन प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. इतर राज्यातील प्रकल्प सुद्धा गुजरातला पळवले जात आहेत. आमच्या राज्यात ज्या कंपन्या येणार होत्या त्या धमकावून, जबरदस्तीने घेऊन गेल्याने त्याचा राग येतो. उद्योगमंत्री फाईव्ह स्टारमध्ये फिरतात पण एमआयडीसी येत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात आल्यानंतर अनेक नागरिक भेटले,  सांगत होते की उद्धव ठाकरे यांना सांगा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. आपलं सरकार असताना सर्वांना घेऊन पुढे जात होतो.  इतरांना खोके देऊन निर्लज्जपणे खुर्चीवर बसणे कितपत योग्य आहे, गद्दारी करून महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार होते, गेला का महाराष्ट्र पुढे? अशी विचारणा त्यांनी केली. 


ते पुढे म्हणाले की, आमचा मतदार संघ कोणता म्हणून विचारतात. मी सांगतो संपूर्ण महाराष्ट्र आमचा मतदारसंघ आहे. सरकार पाडलं आणि महाराष्ट्रात येणारे उद्योग इतर राज्यात गेले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी नक्कल केली. 


इतर महत्वाच्या बातम्या