कोल्हापूर : मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला होणार अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी आयबी खात्याला दिली होती. मुंबईतील दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी बोट निघाली असून त्याचे अक्षांश आणि रेखांश असे आहेत इतकी माहिती माहिती अमेरिकन एजन्सीकडून मिळाली असतानाही मुंबई पोलिस, महाराष्ट्र शासन यांना देण्याची जबाबदारी गुप्तचर संघटनेचे अधिकारी तत्कालीन अधिकारी प्रभाकर अलोक यांची होती. मात्र, खटला सुरू झाल्यानंतर आरएसएस आणि उज्वल निकम या दोघांनी मिळून त्यावेळी शासन आणि कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केला आहे. 


उज्वल निकम हे या सगळ्या बाबींसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकम यांच्यावर केलेले आरोप खरे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


विजय वडेट्टीवारांचे ते विधान व्यक्तिगत काँग्रेसचं मत नाही : नाना पटोले


दरम्यान, शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं विजय वडेट्टीवारांचे विधान हे त्यांचं व्यक्तिगत असून त्यांना कोणती शासकीय माहिती असेल. मात्र, हे काँग्रेसचं मत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या