Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तसेच आपल्या स्पष्टवक्ते शैलीमुळे ती चर्चेत असते. एखाद्या ज्वलंत प्रश्नासह प्रेमप्रकरणाबद्दलही ती भाष्य करते. अशातच आता पुन्हा एकदा तिने एलॉन मस्क (Elon Musk) यांचं ट्वीट रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


एलॉन मस्क यांचं ट्वीट काय आहे?


एलॉन मस्क यांनी ट्वीट केलं आहे,"प्रेमात पडणं ही एक वेगळी अनुभूती आहे. विशेषत: जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तो एक पगारी अभिनेता आणि तुमचं लक्ष वळवण्यासाठी सीआयएने त्याला पाठवलं आहे". 






माझं आयुष्य नाट्यमय - कंगना रनौत


एलॉन मस्कचं ट्वीट कंगना रनौतने रिट्वीट केलं आहे. हे ट्वीट रिट्टीट करत कंगनाने तिच्या आयुष्याबद्दल आणि जुन्या नात्याबद्दल सांगितलं आहे. तिने लिहिलं आहे,"माझ्यापेक्षा आणखी कोणाचं आयुष्य नाट्यमय असेल असं मला कधीच वाटलं नाही. प्रेमप्रकरणामुळे मला तुरुंगात पाठवण्यात येणार होते. ही सगळ्यात जास्त मनोरंजनात्मक गोष्ट आहे". 






कंगना रनौतची ही कमेंट हृतिक रोशन सोबतच्या नात्याबद्दल असावी, असं म्हटलं जात आहे. याधी 'लॉकअप' मध्ये कंगना म्हणाली होती,"मी आणि हृतिक रिलेशनमध्ये (Hrithik Roshan) होतो. 'क्रिश 2' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमची जवळीक वाढली आणि मी त्याच्या प्रेमात पडले. याआधी ब्लू टिक हवी असणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार या मस्क यांच्या निर्णयावरदेखील कंगना रनौतने खास पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. पोस्ट शेअर करत तिने मस्क यांना पाठिंबा दिला होता.


कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात कंगनासह अनुपम खेरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमात मुख्य भूमिकेत काम करण्यासोबत या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील ड्रामाक्वीन सांभाळत आहे. तसेच 'चंद्रमुखी 2' या सिनेमावरदेखील ती सध्या काम करत आहे. 


संबंधित बातम्या


World's Richest Man : एलॉन मस्क यांचं दमदार कमबॅक, श्रीमंतांच्या यादीत पुन्हा पहिल्या नंबरवर