Attack Part 1 OTT Release : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जॉनच्या 'अटॅक' (Attack) सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 27 मे ला हा सिनेमा 27 मे 2022 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
लक्ष्य राज आनंद यांनी 'अटॅक' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर या सिनेमात जॉन व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि रकुल प्रीतदेखील (Rakul Preet) दिसून येणार आहे. या सिनेमासंदर्भात जॉन म्हणाला, 'अटॅक' सिनेमा माझ्यासाठी खास होता आणि कायम खास असेल.
'अटॅक'मध्ये अॅक्शनचा तडका
'अटॅक' सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. तर जॉन अब्राहमदेखील धमाकेदार अॅक्शन करताना दिसून येणार आहे. या सिनेमात जॉनने सोल्जरची भूमिका साकारली आहे.
जॉनचे आगामी सिनेमे
'अटॅक' सिनेमानंतर जॉनचा 'पठाण' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे शूटिंग स्पेनमध्ये करण्यात आले आहे. या सिनेमात जॉन शाहरुख खानसोबत दिसणार आहे. हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'पठाण' मध्ये किंग खान मुख्य भूमिकेत आहे. जॉनच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. या सिनेमात जॉन सैनिकाच्या भूमिकेत असल्याने त्याचे वेगळे रुप प्रेक्षकांना पाहायला मिळाले. जॉनचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. लवकरच जॉनचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
'अटॅक'चा दुसरा भागदेखील येणार
'अटॅक' चा पहिला भाग ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. तर लवकरच प्रेक्षकांना त्याचा पुढचा भागही पाहायला मिळणार आहे. पहिला भाग पाहिल्यानंतरच चाहत्यांना या फ्रँचायझीचा नवीन चित्रपट समजू शकेल. त्यामुळे प्रेक्षक आता घरबसल्या 'अटॅक'चा पहिला भाग पाहू शकतात. 'अटॅक'चा पहिला भाग सत्य घटनेवर आधारित आहे. अटॅक सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. सिनेमागृहातदेखील या सिनेमाने चांगली कमाई केली. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा भारतीय सैनिकांवर भाष्य करणारा आहे.
संबंधित बातम्या