Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतीया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत नवा ट्वीस्ट येणार आहे. या मालिकेत प्रदीप वेलणकर (Pradeep Velankar) तात्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
'जिवाची होतीया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) या मालिकेत सध्या गावात मराठी शाळा बंद करण्यावर आप्पा भर देत आहेत. त्याविरुद्ध अर्जुनचा लढा सुरू आहेच, पण तात्यांचे गावात पुनरागमन झाले आहे. ते आता अर्जुनला कशा प्रकारे मदत करतील, हे पाहायला मिळेल. पण मालिकेत आता तात्यांचा भूमिकेत प्रदीप वेलणकर पाहायला मिळणार आहेत.
निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणारे दिग्गज अभिनेते प्रदीप वेलणकर आता तात्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तात्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम आणि मराठी भाषेवरील प्रभाव प्रदीप वेलणकर कशा प्रकारे निभावतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अर्जुन आणि रेवथी यांचे प्रेम यापुढे कसे फुलत जाणार आहे, हे पाहायला मिळेल.
'जिवाची होतीया काहिली' ही मालिका महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकरचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होत आहे.
'जिवाची होतीया काहिली' सारख्या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वात वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. मराठी आणि कानडी भाषिक ही मालिका आवडीने पाहत आहेत. दिवसेंदिवस या मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. आता ही मालिका काय रंजक वळण घेणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
जिवाची होतिया काहिली
कुठे पाहायला मिळेल? सोनी मराठी
किती वाजता? सोम.-शनि. संध्या. 7:30 वा.
संबंधित बातम्या