Jitendra Awhad On Election :  गेली अनेक वर्षे सर्वच पक्षांनी EVM वर संशय व्यक्त केला आहे. कर्नाटकाने आपल्या सर्व निवडणुका (elections) बॅलेट पेपरवर घेतल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था या राज्याच्या असल्यामुळे राज्याने निर्णय घ्यावा की, या निवडणुका महाराष्ट्रात मतपत्रिकेवर घ्याव्यात. आणि त्या अनुषंगाने कार्यवाही व्हावी अशी मागणी गृहनिर्माणमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. पाच राज्यातील निवडणुक निकालानंतर आव्हाडांनी ही मागणी केली आहे. 


आव्हाडंनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय..


अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या  मतपत्रिकेवर घेतल्या, तो राज्याचा निर्णय असतो. महाराष्ट्रानी देखील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वर घ्याव्यात अशी मागणी आव्हाडांनी ट्विटरवर पोस्ट करत केली आहे.  या संदर्भात मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत (Proposal in Mantralaya) आपण प्रस्ताव मांडणार असल्याचेही डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.






आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडणार


आव्हाड म्हणाले की, एकीकडे ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण होत असताना प्रयोग म्हणून का होईना, महाराष्ट्रातील निवडणूका मतपत्रिकेवर घ्याव्यात, असा माझा आग्रह आहे. माझी ही भूमिका मी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे. राज्याच्या निवडणूका पाहता तो अधिकार राज्याचा असल्याने यावेळेस मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असेही डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या


Sanjay Raut on BJP : गोवा जिंकलं म्हणून स्वागत झालं, ढोल वाजवले, पण... : संजय राऊत


HSC Exam Paper Leak : बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक