Jammu Kashmir : जम्मू- काश्मीरमध्ये सीआयएसएफच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. जम्मू येथील चड्ढा कॅम्पजवळ पहाटे 4.15 वाजता 15 सीआयएसएफ जवानांना कामावर घेऊन चाललेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CISFकडून प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली आहे. सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती दिली. लष्कर या हल्ल्याला प्रत्युत्तर देत असताना दहशतवाद्यांनी तेथून पळ काढाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कारवाईदरम्यान एक एएसआय शहीद झाला आणि इतर दोन जवान जखमी झाले आहेत.
सुंजवानमध्ये दहशतवाद्यांशी चकमक
जम्मू-काश्मीरमधील सुंजवान भागातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, सुरक्षा दलाचा जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या कारवाईत 4 जवानही जखमी झाले आहेत. रात्रीपासून परिसरात चकमक सुरू असल्याचे समजते आहे. जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, अजूनही चकमक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादी एका घरात लपले असण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री जम्मूच्या बठिंडी भागात दहशतवादी असल्याची खबर मिळाली. यानंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली, सुरक्षा दलांची हालचाल पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून, 4 जवान जखमी झाले आहेत.
हेही वाचा :