जालना : साप पकडणे ही एक कला आहे, काही वर्षांपूर्वी फक्त गारुडी लोक साप (Snake) पकडाचे, गावखेड्यात निघालेल्या सापांना रानावनातच वाट करुन दिली जायची, तर कुठे जीवही मारलं जायचं. मात्र, अलिकडच्या काळात सर्पमित्र नव्याने पुढे येऊन साप पकडण्याचं प्रशिक्षण घेतात. त्यामुळे, वन्यजीव मित्र म्हणून ते जनजागृती देखील करतातय. त्यामुळे, आता सर्प मित्रांकडून विषारी सापही पकडले जात असून ते रानावनात सोडले जात आहेत. मात्र, दुर्दैवाने जालन्यातील (Jalna) निरखेडा गावात एका युवकाचा विषारी घोषण साप पकडताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं सर्वत्र हळहळ होत आहे. दुसरीकडे डोंबिवलीतही(Dombivali) सापाने चावा घेतल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीसह तिची मावशीही दगावली आहे.
जालन्यातील नरखेडा गावात साप पकडण्याचे धाडस करणाऱ्या एका तरुणाला जीव गमवावा लागला. गावात मोकळ्या जागी दिसलेला साप पकडण्याचं धाडस करताना एका 30 वर्षीय तरुणाला सापाने चावा घेतला. त्यामध्ये या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. गोविंद हिवाळे अस तरुणाचं नाव असून गावाशेजारी नदीकाठी त्यास साप दिसला होता. सापांबद्दल, विषारी सापांबद्दल ज्ञान नसतानाही या तरुणाने हा साप पकडण्याचं धाडस केलं. मात्र, ह्या विषारी सापाने क्षणार्धात त्याच्या हाताला चावा घेतला. त्यावेळी, तरुणाने हात पाठीमागे घेताच, त्याच्या हातातून रक्तही येत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तो बराच वेळ तिथच होता. अखेर, त्याला होत असलेल्या त्रासाची जाणीव होताच, तातडीने उपचारासाठी या तरुणाला रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
डोंबिवलीत चिमुकलीसह मावशीचा मृत्यू (dombivali snake bite)
डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरातही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. साखरझोपेत असताना सर्पदंश झाल्याने प्राणवी भोईर (वय 3) या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर, तिच्यासोबत झोपलेल्या मावशीलाही साप चावल्याचे निदर्शनास आले होते. आता, 24 वर्षीय मावशी प्राणवी हिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी सुरुवातीला दोघींची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले होते. मात्र, काही वेळात प्राणवीची प्रकृती बिघडली, आणि तिला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, तेथेच तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा
दसरा मेळाव्याला येताना चणा डाळ, गुळ, गव्हाचे पीठ आणा; पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन