Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये 22 एप्रिलला झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण भारत हादरला . या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या .यात एकूण 28 पर्यटकांचा मृत्यू झाला . जम्मू काश्मीरला गेलेल्या जालन्यातील एका तरुणाने पहलगामधील हल्ल्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रातील जालनाच्या एका पर्यटकाला रेखाचित्रातील संशयित दहशतवाद्यांपैकी एकाने 'तू काश्मिरी आहेस का? ' असा प्रश्न विचारल्याचा दावा केल्यानंतर आज ATS आणि स्थानिक तपास यंत्रणांकडून जालन्याचा तरुणाची दीड तास चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे . (Jalna)
या चौकशी दरम्यान आदर्श राऊतने घटनास्थळाची माहिती आणि मॅगी स्टॉलचा फोननंबर तपास यंत्रणांकडे दिलाय .यामध्ये झालेले संभाषण आणि इतर बाबींचा समावेश आहे .
NIA, स्थानिक तपास यंत्रणाकडून कसून चौकशी
जालना येथून काश्मीरच्या पहलगाममध्ये गेलेल्या आदर्श राऊत याने हल्ल्याच्या आदल्या दिवशी त्याला एका संशयित व्यक्तीने तू कश्मीरी आहेस का हिंदू आहेस का असे प्रश्न विचारले होते .त्यानंतर आज इथे गर्दी कमी आहे. उद्या पुन्हा येऊया अशी आपापसात चर्चाही केल्याचा दावा जालन्याच्या आदर्श राऊत या पर्यटकांनी केला होता . यानंतर झालेले संभाषण घटनास्थळाची माहिती अशा सगळ्या बाबी तरुणाने आधीच NIAला मेल करून पाठवल्या होत्या . या दाव्यावरून आज स्थानिक तपास यंत्रणा सह एटीएस ने तरुणाची दीड तास चौकशी केली .संशयीत दहशतवाद्यांचे आदर्श राऊत सोबत नेमके काय बोलणे झाले ?मॅगी खरेदी तेथील पैशांचे ट्रांजेक्शन यामध्ये किती वेळा चे अंतर होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी केल्याचं समजतंय . यानंतर संपूर्ण तपास यंत्रणा सतर्क झाले आहेत .पहलगाम हल्ल्याशी संबंधित धागेद्वारे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे .
राऊत कुटुंब सुट्ट्यामुळे पहलगामला गेले होते. 21 एप्रिलला आपल्याला प्रश्न केले होते दरम्यान हल्ला झाल्यानंतर रेखाचित्र जारी झाल्यावर आपल्याला रेखाचित्रतील आरोपीचा चेहरा आठवल्याचं आदर्श राऊत यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचे धाबे दणाणले
पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कारवाई होईल या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. दहशतवाद, प्रांतिक स्वायत्ततेच्या मागण्या आणि धार्मिक कट्टरतावादाच्या विळख्यात पाकिस्तान आधीच खिळखिळा झाला आहे. खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, सिंध आणि पाकव्याप्त काश्मीर या चारही प्रांतात अंतर्गत बंडाळीची चिन्हं दिसत आहेत.
हेही वाचा: