Raosaheb Danve : जातनिहाय जनगणनेवरुन भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं दानवेंनी स्वागत केलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, इंदिरा गांधी आणि देवगौडा यांच्या काळात जातीय जनगणना झाली नाही. सत्तेत असताना जनगणना न करणारे या निर्णयाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सत्तेत असताना राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेची मागणी का लावून धरली नाही?
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. सत्तेत असताना त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी का लावून धरली नाही? असा सवाल दानवेंनी यावेळी उपस्थित केला. आमचं सरकार निर्णय घेताना विरोधकांना विचारत नाही, असा टोला देखील दानवेंनी राहुल गांधी यांना लगावला.
संजय राऊत हा विषय आता हसण्यासारखा झालाय
दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील लक्ष बाजूला व्हावं यासाठी जनगणना काढली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यांचा या विधानावरही दानवे यांनी टोला लगावला. संजय राऊत हा विषय आता हसण्यासारखा झाला आहे. राऊत काय बोलतील हे सांगता येत नाही, असे दानवे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा (Central government caste survey) निर्णय घेतल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. दरम्यान, या निर्णयामागे कोणताही कृतीबद्ध आराखडा नसल्याने राहुल गांधी यांनी केव्हापासून जातिय जनगणना (Caste-wise census) करणार आणि निधीची तरतूद केव्हा करणार? अशी विचारणा केली आहे. जातीय जनगणनेसाठी आराखडा तयार करण्यात आम्ही सरकारला आमचा पाठिंबा देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. जातीय जनगणना ही पहिली पायरी आहे. आमचे ध्येय जातीय जनगणनेद्वारे विकासाचा एक नवीन नमुना आणणे आहे. फक्त आरक्षणच नाही तर आम्ही हा केंद्रीय प्रश्न देखील विचारत आहोत, ओबीसी, दलित, आदिवासी, या देशात त्यांचा सहभाग काय आहे? हे जातीय जनगणनेद्वारे उघड होईल, परंतु आपल्याला जातीय जनगणनेच्या पलीकडे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या: