जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची 14 ऑक्टोबरला जालना येथील अंतरवाली सराटी गावात जाहीर सभा होणार आहे. या सभेला राज्यभरातील मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये एकटवणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये या सभेला येण्यासाठी लग्नाप्रमाणे मूळवाटी देऊन सभेला येण्याचे आमंत्रण दिल जातंय. अंबड तालुक्यातल्या भांबेरी गावांमध्ये तर महिला स्वतः अक्षता तयार करत असून, घरातील पुरुष गावागावात जाऊन अक्षता देऊन सभेचं आमंत्रण देत आहे. 


मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा येत्या 14 ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी गावात होणार आहे. या सभेची राज्यभरात चर्चा असून, आपल्या आरक्षणाच्या हक्काच्या मागण्यासाठी मराठा समाजाचा आवाज सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येकाने 14 तारखेच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. जरांगेचा हा संदेश आता शहरापासून गाव खेड्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचताना पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे सभेचा संदेश पोहचवण्यासाठी युवकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला असतांना, दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी मात्र पारंपरिक पद्धतीचा वापर करत गावातील घराघरात सभेचं आमंत्रण पाठवण्याची व्यवस्थापन केले आहे. यासाठी मुळ पत्रिकांचा म्हणजेच लग्नात वापरल्या जाणाऱ्या अक्षताचा वापर करून घराघरात जाऊन सभेचं आमंत्रण दिले जात आहे. 


शेतातील कामे लवकर आटोपून महिला 14 तारखेची तयारी करतायत...


जालना जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात मूळपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. गावागावातील महिला एकत्र येऊन मूळ पत्रिका तयार करण्याचे काम करत आहेत. तर युवक या मूळपत्रिका पाहुण्या पर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे अनेकदा गावखेड्यात किंवा कायम शेतात राबणाऱ्या महिला पर्यंत अनेक विषय पोहचत नाहीत. मात्र, आरक्षणाचा विषय त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आणि सभेचं आमंत्रण देण्यासाठी अक्षता वापरल्या जात आहे. यासाठी ग्रामीण महिला आपली शेतातील कामे लवकर आटोपून 14 तारखेची तयारी करण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. 


सभेसाठी अशीही तयारी...



  • विशेष म्हणजे अनेक गावांनी पुढाकार घेत निधी उभा केला आहे. या निधीतून मोर्चाला जाणाऱ्या समाज बांधवांसाठी नाष्टा, पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

  • मोठ्या प्रमाणात वाहने सभेसाठी जाणार आहेत, या वाहनांमध्ये काही बिघाड झाल्यास समाजातील मेकॅनिक युवकांनी पुढाकार घेतला आहे.

  • मोर्चासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी मोफत सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • मेडिकल व्यवसायात असणाऱ्या व्यवसायिकांकडून ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभारली जाणार आहेत. याठिकाणी आवश्यक प्रथमोपचार साहित्य आणि औषधी मोफत पुरविली जाणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Manoj Jarange :संभाजीनगरात आज मनोज जरांगेंच्या 14 ऑक्टोबरच्या सभेचा ट्रेलर; होणारी गर्दी लक्षात घेता