Manoj Jarange Patil LIVE Updates: मराठ्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला, भुजबळांवर जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil Sabha LIVE Updates: आज जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाचा एल्गार, सभास्थळी मोठी गर्दी, 10 दिवसांत आरक्षण द्या, जरांगेंची एबीपी माझाला माहिती मिळाली आहे.
माझं फेसबुक अकाऊंट बंद केलं - मनोज जरांगे पाटील
उद्रेक, जाळपोळ करु नका, आरक्षण यांच्या छाताडावर बसून घेऊ, गाफील राहू नका. लोक आपल्याला उचकवतील. उद्रेक करु नका, शांततेनं आंदोलन करा - मनोज जरांगे पाटील
आपल्याच फूट पाडण्याचा प्रयत्न होईल - मनोज जरांगे पाटील
मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही. आता जमिनीचा, पुराव्याचा घाट घालू नका. मिळालेल्या पुराव्याचा आधार घेऊन आरक्षण द्या - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil Ultimatum : ''24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही, तर मी टोकाचं उपोषण करणार, मग एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाही तर मराठ्यांची विजय यात्रा निघेल.''
आरक्ष मिळाल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचीही मागे हटणार नाही - मनोज जरांगे पाटील
22 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा सांगितली जाणार- मनोज जरांगे पाटील
येत्या 10 दिवसांत मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर पुढची जबाबदारी सरकारची - मनोज जरांगे पाटील
''आंदोलन शांततेत होणार हा माझा तुम्हाला शब्द, पण शांततेतच आरक्षण पण मिळणार हा मराठा समाजाचा शब्द, काळजी करून नका. शांततेनं मराठा समाज एकत्र''
''मराठा भावांनो, आरक्षणाचा दिवस जवळ आलाय. 22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची दिशा ठरणार आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारची मुदत. 22 ऑक्टोबरला सगळ्या मराठा समाजाला सांगण्यात येणार आहे, पुढे काय करायचं. ''
''मराठ्यांना विरोध करणं बंद करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या, हेच मराठे दिल्लीपर्यंत तुमचा गुलाल नाचवतील.''
''याच मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार निवडून दिले आहेत. हे तुम्ही विसरू नका. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणायला मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. पंतप्रधान साहेबांनी फडणवीस साहेबांना समज द्या. ते खालचे कार्यकर्ते अंगावर घालतायत. तुमच्यासाठी मराठ्यांनी काहीपण केलं आहे. उलट केंद्राला आणि राज्याला विनंती करतो, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.''
''एकदा मराठ्यांनी तुला सोडलं. तु एकदा मराठ्यांचं वाटोळं केलं. तूच कोर्टात गेला, मराठ्यांविरोधात आग ओकायचं कमी करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला समज द्या, तो तुमचा हा कार्यकर्ता आहे.''
मराठ्यांची औलाद हिंसा करणारी नाही - मनोज जरांगे पाटील
''त्यांना यश मिळवायचं होतं म्हणून 'एक मराठा, लाख मराठा' ची घोषणा दिली. आणि आता एक लाख मराठे एकत्र आलेत, त्या एक लाख मराठ्यांचं कल्याण होणार आहे. तर तिथे हा सांगतो मी हिंसा करणार आहे, मला अटक करा.''
ते म्हणाले मला रात्री अटक करा, मी हिंसा करेन म्हणून मला रात्री अटक करा - मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी भाषणादरम्यान मराठा समाजाला आवाहन करत रुग्णवाहिकेला वाट करुन दिली.
''आणखी एक उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्ता आहे, म्हणतात लोक उपमुख्यमंत्र्यांनी हे असे यडपटं पाळलेच कसे, उपमुख्यमंत्री जास्त ती एक पंचाईत.''
अजित पवार साहेब तुमच्या पक्षाच्या नेत्यांना समज द्या, नाहीतर मी असा मागे लागेन की मी सोडणारच नाहीय - मनोज जरांगे पाटील
सभेसाठी गोदाकाठच्या 123 गावांपैकी 22 गावांतून 21 लाख निधी जमा झाला. इतर 101 गावांकडे पैसे जमा, तरीही पैसा घेतला नाही कारण ही लढाई पैशासाठी नाही - मनोज जरांगे पाटील
''महाराष्ट्रातील मराठा समाज आम्हाला निधी द्यायला तयार होता मात्र, आम्ही सांगितलं आम्हाला मराठा समाजाची सेवा करायची आहे, म्हणून पैसे देऊ नका.''
''माझा माय-बाप मराठा शेतात काबाड कष्ट करतो. घाम गाळतो आणि घामातून आमच्या गोदा पट्ट्यातील 123 गावानं निधी जमा केला आहे. कापूस विकून शे-पाचशे जमा केले आणि इथे येणाऱ्या समाजाची सेवा करण्याचं काम केलं.''
''माझा माय-बाप मराठा शेतात काबाड कष्ट करतो. घाम गाळतो आणि घामातून आमच्या गोदा पट्ट्यातील 123 गावानं निधी जमा केला आहे. कापूस विकून शे-पाचशे जमा केले आणि इथे येणाऱ्या समाजाची सेवा करण्याचं काम केलं.''
मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांवर नाव न घेता टीका, ''आता नवीन फॉर्म्युला, एक दिवस म्हणाला आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही, एकट्याच्याच मागे लागलं. आपण बोलायला बंद केलं. काल परत फडफड करायला लागले. काल म्हणतात, सात कोटी रुपयेच फक्त खर्च आला. 100 एकर विकत नाही घेतलं. सभेसाठी शेतकऱ्यानं फुकट दिल्या आहे. मराठ्यांनी स्वत:च्या गाड्या लावल्या. ज्या गोरगरीब मराठ्यांनी तुला मोठं केलं, त्यांचच रक्त पिऊन तुझ्यावर धाड पडली. गोरगरीब जनतेचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष आतून बेसन खाऊन आला आणि हा आम्हाला शिकवतो पैसे कुठून आले.'
शेतीवर कष्ट करून या देशाला अन्नधान्य पुरवतो. त्याचे-त्याचे लेकरं आरक्षणापासून वंचित न राहता मराठा समाजाच्या गोरगरीब लोकांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारनं तातडीने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं. मराठ्यांवरील गुन्हे मागे घ्या.
''कायदा सांगतो व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या. शेती व्यवसायामुळे कुणबी प्रमाण पत्रं दिली. महाराष्ट्रातील मराठा समाजाला व्यवसाय शेती, त्यामुळे देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आज या मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे की, सर्वांनी या दोघांनी मिळून मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून कुणबी प्रमाणपत्र देण्याच निर्णय घ्या.''
10 दिवसांपेक्षा जास्त वाट बघण्याची आता आमची तयारी नाही - मनोज जरांगे पाटील
या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रानं आणि राज्यानं तातडीने निर्णय घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि समावेश केल्याचा जाहीर निर्णय करावा.
जरांगे पाटील यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी विनंती करत म्हटलं की, ''देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांसह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला या कोट्वधी मराठा समाजाच्या वतीने हात जोडीने विनंती करुन सांगतो, सगळ्यात मोठा समाज, या मराठा समाजाचे विनाकारण हालअपेष्टा करु नका.''
Manoj Jarange Patil LIVE Updates: हे आंदोलन पैशासाठी नाही जनतेसाठी - मनोज जरांगे पाटील
'आज सरकारला जाहीरपणे शेवटची विनंती करुन सांगतो, मराठा समाजासाठी गठीत केलेल्या समितीचं काम बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं, चार दिवसात कायदा पारीत होणार नाही, एक महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारीत करतो. पाच हजार पानांचा पुरावा समितीला मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करा.'
आता आपण नाही हटायचं, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय, हा जरांगे पाटील एक इंचही मागे हटणार नाही- मनोज जरांगे पाटील
आता आपण नाही हटायचं, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय, हा जरांगे पाटील एक इंचही मागे हटणार नाही- मनोज जरांगे पाटील
मराठा समाज शांततेत आलाय, पोलिसांनीही सांगितलं- मनोज जरांगे पाटील
माझा मराठा समाज शांततेत आला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत घरी जाणार - मनोज जरांगे पाटील
मराठे दिलेला शब्द मोडत - मनोज जरांगे पाटील
तुमच्या हातात आणखी 10 दिवस आहेत, या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, नाहीतर पुढचं 40 व्या दिवशी सांगू - मनोज जरांगे पाटील
1. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र
2. कोपर्डी बलात्कारातील आरोपींना शिक्षा
3. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना निधी आणि सरकारी नोकरी
4. आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचं सर्वेक्षण करावं.
5. सार्थी संस्थेमार्फत PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे
एक महिन्याचा आढावा सांगतोय : जरांगे पाटील
मराठा बांधवांना 'जय शिवराय' म्हणत जरांगे पाटलांनी जालन्यातील आंतरवाली येथे सभेतील भाषणाला सुरुवात केली.
Manoj Jarange Patil Sabha at Jalna LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाला सुरुवात
Manoj Jarange Patil Sabha at Jalna LIVE : मनोज जरांगेंच्या जालन्यातील सभेला अभूतपूर्व गर्दी झाली आहे. मनोज जरांगे स्वतः सभास्थळी दाखल झाले आहेत. मनोज जरांगेंचं संपूर्ण कुटुंब सभास्थळी उपस्थित आहे. तर मनोज जरांगेंच्या मातोश्री सभेच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. जमलेल्या सर्व मराठा आंदोलकांना त्यांनी हात उंचावत अभिवादन केलं आहे.
Manoj Jarange Sabha LIVE : आज जालन्यातील आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आहे. जरांगेंच्या सभेसाठी सराटीत प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 100 एकरच्या मैदानावर जरांगेंची जाहीर सभा होणार आहे. रात्रीपासूनच या मैदानात मराठा आंदोलकांनी हजेरी लावली आहे. जरांगेंचं संपूर्ण कुटुंब सभास्थळी उपस्थित आहे. अशातच मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Manoj Jarange Patil Sabha at Jalna LIVE : या मुद्द्यांवर असणार मनोज जरांगे पाटील यांचे भाषण
- सरकारला देण्यात आलेल्या 40 दिवसांची मुदत संपण्यापूर्वी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
- शनिवारी मेळावा संपताच रविवारपासूनच जरांगे पाटील आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करू शकतात.
- आंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण सुरू राहील. व्याप्ती वाढवण्यावर जरांगे पाटलांचा भर असू शकेल.
- जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ती 24 ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे 24 पासून ते पुन्हा आमरण उपोषण सुरू करू शकतील.
- मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतले व ओबीसीतून आरक्षणाचा शासन निर्णय हातात घेऊनच ते आंदोलन मागे घेणार असल्याचे सांगू शकतात.
- काही मंत्री आरक्षणविरोधी वक्तव्ये करीत आहेत, त्यांचाही समाचार घेऊ शकतात.
- मराठा समाज मागास सिद्ध होण्यासाठी 26 पैकी किमान 13 गुण आवश्यक होते. गायकवाड आयोगाच्या अहवालात समाजाला 21.5 गुण दिले आहेत. याचा उल्लेख करू शकतात.
- मराठा आंदोलनात सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकते असा आरोप मनोज जरांगे पाटील सातत्याने करीत आहेत. त्यासंदर्भात ते काही गौप्यस्फोट करू शकतात.
Manoj Jarange Patil Sabha at Jalna LIVE : जालना (आंतरवाली सराटी) : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आज जालना येथील आंतरवाली सराटी गावात आज भव्य अशी जाहीर सभा होत आहे. यावेळी मनोज जरांगे यांचे भाषण होणार आहे. दरम्यान, या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली गावात दाखल होत आहे. आतापर्यंत देशात कधी नव्हे अशी गर्दी या सभेत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सभा आज इतिहास घडवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यासोबतच मनोज जरांगे आजच्या सभेतून नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
Manoj Jarange Patil Sabha at Jalna LIVE : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. या 40 दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुदत यावेळी देण्यात आली आहे. तर, 14 ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे या निमित्ताने अंतरवाली सराटी गावात 14 ऑक्टोबरला सभा आयोजित करण्यात आली आहे. पण त्याआधी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा केला.
जरांगेंची सभा 100 एकर ग्राऊंडवर घेण्यात येणार आहे. तर यासाठी 80 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीये. तर या सभेसाठी दहा हजार स्वयंसेवक हे उपस्थित राहणार आहेत. दहा अग्निशमन दलाच्या गाड्या सभेच्या स्थळी उपस्थित असतील. यामध्ये 110 रुग्णवाहिका, त्यात 35 कार्डीयाक अम्ब्युलन्स असणार आहेत. तसेच 40 बेडस, 300 डॉक्टर, 300 नर्सिंग स्टाफ असेल. 12000 लिटरचे 50 पाणी टँकर या सभेच्या मैदानात असतील. 5 लाख पाणी बॉटल्स, 1000 लाऊड स्पीकर, 20 LED स्क्रीनची तयारी या सभेसाठी करण्यात आली आहे.
Jalana News Updates LIVE: जालन्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली केंद्रप्रमुख तथा मुख्यध्यापकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत.
Manoj Jarange LIVE : जालना : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला दिलेली मुदत ही पुढच्या दहा दिवासांमध्ये संपणार आहे. त्याचाच आधी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. तसेच या सभेची सध्या जय्यत तयारी सुरु करण्यात आलीये. तर 100 एकर वरील मैदान हे सभेसाठी सज्ज झालयं.
Manoj Jarange Patil Sabha at Jalna LIVE : मनोज जरांगे आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात सभा आहे. आज दुपारी 12 वाजता सभेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच सभास्थळी मोठी गर्दी झाली आहे. काल रात्रीपासूनच मैदानात लोक जमले आहेत. अनेक लोक गाड्या घेऊन आंतरवालीत आलेत. सकल मराठा समाजाच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी जवळपास 100 एकर जागा तयार करण्यात आली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. दरम्यान आंतरवाली सराटी गावातील सभेमुळे अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
Manoj Jarange Patil Sabha LIVE Updates: मनोज जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil Sabha) आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (jalna antarwali ) गावात सभा झाली. दुपारी 12 वाजता सभेला सुरुवात झाली. त्याआधीच सभास्थळी मोठी गर्दी झाली . काल रात्रीपासूनच मैदानात लोक जमले आहेत. अनेक लोक गाड्या घेऊन आंतरवालीत आलेत. सकल मराठा समाजाच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी जवळपास १०० एकर जागा तयार करण्यात आली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. दरम्यान आंतरवाली सराटी गावातील सभेमुळे अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला दिलेली मुदत ही पुढच्या दहा दिवासांमध्ये संपणार आहे. त्याचाच आधी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. तसेच या सभेची सध्या जय्यत तयारी सुरु करण्यात आलीये. तर 100 एकर वरील मैदान हे सभेसाठी सज्ज झालयं.
रात्रीपासूनच सभेसाठी गर्दी
मनोज जरांगे यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात सभा आहे. त्यासाठी आज रात्रीपासूनच तिथं गर्दी झाली आहे. अनेक लोक गाड्या घेऊन आंतरवालीत आदल्या दिवशीच आले आहेत. रात्रभर मुक्काम करुन आज सभेला सर्वजण उपस्थिती लावणार आहेत. आजच्या सभेसाठी होणार अलोट गर्दी लक्षात घेत, पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जालन्यात आज शाळा बंद
जालन्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली केंद्रप्रमुख तथा मुख्यध्यापकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत.
मनोज जरांगेंच्या सभेसाठी यंत्रणा सज्ज
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. या 40 दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुदत यावेळी देण्यात आली आहे. तर, 14 ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे या निमित्ताने अंतरवाली सराटी गावात 14 ऑक्टोबरला सभा आयोजित करण्यात आली आहे. पण त्याआधी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा केला.
जरांगेंची सभा 100 एकर ग्राऊंडवर घेण्यात येणार आहे. तर यासाठी 80 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीये. तर या सभेसाठी दहा हजार स्वयंसेवक हे उपस्थित राहणार आहेत. दहा अग्निशमन दलाच्या गाड्या सभेच्या स्थळी उपस्थित असतील. यामध्ये 110 रुग्णवाहिका, त्यात 35 कार्डीयाक अम्ब्युलन्स असणार आहेत. तसेच 40 बेडस, 300 डॉक्टर, 300 नर्सिंग स्टाफ असेल. 12000 लिटरचे 50 पाणी टँकर या सभेच्या मैदानात असतील. 5 लाख पाणी बॉटल्स, 1000 लाऊड स्पीकर, 20 LED स्क्रीनची तयारी या सभेसाठी करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -