Manoj Jarange Maratha Morcha LIVE: मनोज जरांगे अंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघाले, आरक्षणासाठी हजारो मराठा आंदोलक सज्ज
Manoj Jarange Maratha Morcha: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज अंतरवाली सराटीवरुन मुंबईला मोर्चा निघणार आहे. मनोज जरांगे नेतृत्त्व करणार
पार्श्वभूमी
Manoj Jarange Maratha Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा काढला जाणार आहे. आज सकाळी 10 वाजता मराठा आंदोलक अंतरवाली सराटीवरुन निघतील. मुख्यमंत्री देवेंद्र...More
मनोज जरांगे यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यात दुमत असल्याचे काही कारण नाही..परंतु, मुंबई, कोकण, महाराष्ट्र व देशात सध्या गणपती बाप्पांचा उत्सव सुरू आहे..या कालावधीमध्ये आंदोलनापेक्षा चर्चेतून ते पुढे आले तर एक समाधानकारक तोडगा निघू शकतो..
मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू राहिलेल्या बीड जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आंदोलनासाठी पाठिंबा वाढतोय. मुंबईकडे जाण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. आणि त्यांच्यासोबत जाण्यासाठी बीडमधून मोठ्या संख्येने मराठा समाज अंतरवली सराटीत दाखल झाले. ट्रकच्या ट्रक भरून मराठा समाजातील सदस्य पंधरा दिवसांची शिदोरी घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. एक ना अनेक ट्रक अशा स्वरूपात अंतरवली सराटीवरुन मुंबईला निघाले होते.
मनोज जरंगे यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरातील गाव गाड्यांमधून मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले आहेत परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून विविध गाड्यांच्या माध्यमातून मराठा समाज बांधव युवक हे मुंबईकडे निघाले आहेत दोन महिन्याचा किराणा गॅस शेगडी भगुने व इतर साहित्य घेऊन हे मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार या मराठा बांधवांनी केलाय.
-सरकारने जरांगे सोबत चर्चा करावी.. लोकांना आंदोलनाची झळ बसणार नाही याची काळजी सरकारने घ्यायची असते
-आज गणेश चतुर्थी आहे.. गणपतीचे विचार सरकार ने आत्मसात केले असते, तर आज आंदोलनाची गरज पडली नसती..
-मराठा, obc मागासवर्गीय सर्वांना या सरकारने फसविले.. व्यसनाधीन समाज सरकार निर्माण करत आहे..
-आंदोलनाची धग थांबवायची असेल तर गणपतीचे विचार सरकार ने स्वीकारावे.
-काँग्रेस ने वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे.. जात निहाय गणना करा, त्यातून हे सर्व आरक्षणाचे प्रश्न निकाली निघतील..
-जात निहाय गणनेच्या आमच्या मागणीनंतर मोदी सरकार ने त्याबद्दलचे निर्णय घेतले, मात्र प्रक्रिया अजूनही सुरू केलेली नाही
-जरांगे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे. मात्र सरकारने ही त्यांच्याशी बोलले पाहिजे.. चर्चा केली पाहिजे..
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाल दिली आहेत त्यासाठी राज्यभरातील मराठा समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा आवाहन केलं होतं त्यानंतर हिंगोली शेकडो समाज बांधव रात्रीपासून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत तर आज सकाळी जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे या गावातून सुद्धा शेकडो समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत साधारणतः 24 छोट्या मोठ्या वाहनांमधून मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत महिनाभर पुरे एवढं राशन सामान यासह आवश्यक तेवढ्या सर्व गरजेच्या वस्तू घेऊन मुंबईला निघालो आहे अशी माहिती यावेळी समाज बांधवांनी दिली आहे.
मुंबई आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांना जालना पोलिसांची अटी शर्तींसह परवानगी दिली आहे. जालना पोलिसांकडून मनोज जरांगे यांना परवानगीसह 40 अटींचे पत्र पाठवण्यात आले आहे. मुंबईतील आंदोलनावर ठाम असलेल्या मनोज जरांगे यांना काल जालना पोलिसांनी कोर्टाच्या निर्णयाची प्रत दिली होती. मात्र, त्यानंतरही मनोज जरांगे यांनी आपण मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते.
परभणीतील उबाठा खासदार तथा शिवसेनेचे उपनेते संजय जाधव यांनी मराठा आरक्षणावरून सरकार वर गंभीर आरोप केले आहेत.लोकसभा निवडणुकीनंतर जरांगे पाटलाचा आंदोलन स्थगित झालं होतं इतके दिवस सरकारने का काहीच केलं नाही आणी आता त्यांना ऑन द स्पॉट तुम्ही येवू नका म्हणतात हे चालणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा विषय मिटवून पुण्य वाटून घ्यावे अन्यथा एक दिवस राज्यांमध्ये उद्रेक होईल असेही संजय जाधव म्हणाले आहेत.हाके सदावर्ते हे लोक सरकारची बाजू घेवून बोलत आहेत.मी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आणि मराठा समाजाने ही सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.
परभणीचे उबाठा खासदार संजय जाधव यांची सरकार वर टीका
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले
देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा विषय मिटवुन पुण्य वाटून घ्यावे
जरांगे पाटलांच्या आंदोलनात मी सहभागी होणार मराठा समाजानेही सहभागी व्हावे
तुम्ही ऑन द स्पॉट सांगताय मुंबईला जाऊ नका ते जमणार नाही
भाजप देशात आणि राज्यात हुकुमशाही पेक्षा जुलूमशाही करत आहे
शिंदे समितीची मुदतवाढ हे खेळणे आहे
लोकसभेनंतर जरांगे यांचे आंदोलन स्थगित झाले होते इतके दिवस यांनी काय केले
राज्यात एक दिवशी उद्रेक होणार हे दिसतय
सरकार जातीजातीत तेढ निर्माण करतय
सदावर्ते,लक्ष्मण हाके,यांचा विरोध म्हणजे सरकारची भूमिका
ज्या दिवशी जरांगे पाटील आंदोलनासाठी तयार होतात तेंव्हा हाकेंना जाग येते
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हेच लोक सरकार च्या विरोधात होते आज हेच लोक सरकार च्या बाजूने आहेत
मी खासदार म्हणून नाही तर समाजाचा एक व्यक्ती म्हणून २९ ला आंदोलांत सहभागी होणार..
मनोज जरांगे यांच्या मुंबईच्या आंदोलनाला माझा आणि माझ्या परिवाराचा पाठिंबा असल्याचा ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने लढा देत आहेत. यामुळे सर्वांनी त्यांच्या या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे.
लेकरांचा बाप मारला त्यावेळेस लक्ष्मण हाके कुठे होते असा सवालही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी विचारला आहे. मी ओबीसी असतानाही त्यांनी न्यायाच्या लढाईत साथ दिली नाही.लक्ष्मण हाके हे समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी केलाय. मनोज जरांगे पाटील हे सगळ्या समाजासाठी आवश्यक आहेत.या आधीच ओबीसींना गोपीनाथ मुंडेंनी आरक्षण दिल्याची आठवण देखील हाके यांना करून दिली आहे.
मी मुंबईत येतो मला मारा, मी बलिदान देण्यासाठी तयार आहे..
परवानगी द्यायची की नाही हे मुख्यमंत्री फडणवीस ठरवणार, आता कळेल फडणवीस विरोधी आहे की नाही,
धनगर समाजाचे नेते देखील पाठिबा देण्यासाठी येत आहेत.
परवानगी येत असते, जात असते आपण मागे हटत नाही
काल एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, फडणवीस साहेब मराठ्यांच्या संयम ढासळू देऊ नका,
मी मुंबईत येतो मला मारा, मी बलिदान देण्यासाठी तयार आहे..
इंग्रजांनी जे केलं नाही ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात सुरू
सणाला गालबोट लागेल, असे आम्ही कधीच पाऊल उचलु शकत नाही,
फडणवीस यांना आपली चूक झाकायची आहे, त्यामुळे देवाला पुढे करत आहे
देव देवतांना पुढे करून गोरगरीब मराठा समाजाला वेठीस धरताय
सरकारने नवीन अचानक कायदा काढला आहे,
आमरण उपोषण आपण कायद्यानुसार करणार होतो.
कालच याचिका येते आणि कालच निकाल येतो, आम्ही देखील बाजू मांडली आहे.
दहशतवादी सारखे डाव टाकले नाही पाहिजे सरकार ने,, इंग्रजांने जे केलं नाही ते फडणवीस यांच्या काळात सुरू आहे
इंग्रजांनी जे केलं नाही ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात सुरू
सणाला गालबोट लागेल, असे आम्ही कधीच पाऊल उचलु शकत नाही,
फडणवीस यांना आपली चूक झाकायची आहे, त्यामुळे देवाला पुढे करत आहे
देव देवतांना पुढे करून गोरगरीब मराठा समाजाला वेठीस धरताय
सरकारने नवीन अचानक कायदा काढला आहे,
आमरण उपोषण आपण कायद्यानुसार करणार होतो.
कालच याचिका येते आणि कालच निकाल येतो, आम्ही देखील बाजू मांडली आहे.
दहशतवादी सारखे डाव टाकले नाही पाहिजे सरकार ने,, इंग्रजांने जे केलं नाही ते फडणवीस यांच्या काळात सुरू आहे
-सरकारला सणाच्या काळात अशांतात निर्माण करायची आहे,
-हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवले तर हिंदू विरोधी कोण.
-हिंदूला अडवण्याचा हट्ट का? सरकार म्हणून हिंदूला विरोध का करता?
-न्यायालयाने परवानगीसाठी अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-27 तारखेला त्यांना आडवता येत नाही म्हणून नवा कायदा आणला.
-याचिका कालच दाखल, कालच निकाल. मात्र सरकारने दहशतवादा सारखे वागू नये.
चूक झाकण्यासाठी देव-देवतांना पुढे केलं जातंय
आम्ही हिंदू असून देखील आमच्या सणावर आम्हाला रोखले जातंय
सर्व देवांची आम्ही पूजा करतो, काही लोकांकडू राजकारण करण्यासाठी खऱ्या हिंदू लोकांना अडवले जाते,
अमित शाह ,मोदी यांनी उत्तर द्यावेत
मुंबईच्या दिशेने लगेच निघणार आहोत, आता थांबायचं नाही
कायद्याच्या नियमात आझाद मैदानवर उपोषण सुरू होणार
मुंबईच्या दिशेने लगेच निघणार आहोत, आता थांबायचं नाही
समाजाची मान खाली होणार नाही याची काळजी घ्या, शांत राहायचं आहे.
जगाच्या पाठीवर कधी लढाई झाली नाही अशी लढाई लढायचीय, त्यासाठी कितीही दिवस लागले तरी चालेल.
आंतरवाली सराटीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त, मराठा आंदोलकांची पाटील.. पाटील... घोषणाबाजी. मनोज
परभणीतील उबाठा खासदार तथा शिवसेनेचे उपनेते संजय जाधव यांनी मराठा आरक्षणावरून सरकार वर गंभीर आरोप केले आहेत.लोकसभा निवडणुकीनंतर जरांगे पाटलाचा आंदोलन स्थगित झालं होतं इतके दिवस सरकारने का काहीच केलं नाही. आता त्यांना ऑन द स्पॉट तुम्ही येवू नका म्हणतात हे चालणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा विषय मिटवून पुण्य वाटून घ्यावे अन्यथा एक दिवस राज्यांमध्ये उद्रेक होईल असेही संजय जाधव म्हणाले आहेत. हाके आणि सदावर्ते हे लोक सरकारची बाजू घेऊन बोलत आहेत. मी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आणि मराठा समाजाने ही सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनासाठी येणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यातील सकल मराठा समाजबांधवांची एक महत्वाची बैठक कोटमगाव देवस्थान येथे पार पडली..या बैठकीत ' एक भाकरी समाजासाठी ' देण्याचे ठरले असून मुंबईतील आंदोलनाला येवल्यातील प्रत्येक गावातून भाकरी नेण्याचे ठरले आहे..मोर्चाच्या नियोजनासंदर्भात, मुंबईत होणाऱ्या सभेतील सहभाग, प्रवासाची सोय, शिस्तबद्ध आंदोलन आणि शासनासमोर ठेवायच्या मागण्यांवर देखील या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली..
मुंबई आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांना जालना पोलिसांची अटी शर्ती सह परवानगी...जालना पोलिसांकडून मनोज जरांगे यांना परवानगी सह 40 अटींचे पत्र...मुंबई आंदोलनावर ठाम असलेल्या मनोज जरांगे यांना काल जालना पोलिसांनी दिली होती कोर्टाच्या निर्णयाची प्रत...
जालना पोलिसांकडून मनोज जरांगेंना 40 अटी
1)सदर प्रवासामध्ये आक्षेपार्ह घोषणा तसेच जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होणार नाही. याची दक्षता घ्यावी.
2)सदर प्रवासाचा मार्ग हा घोषीत केल्या प्रमाणेच राहील व नंतर बदलणार नाही याची दक्षता घ्यावी.
3) सदर प्रवासादरम्यान अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहन े जसे अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड इत्यादी तसेच इतर व वाहतुक / रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
4)सदर प्रवासा दरम्यान खाजगी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्याची जबाबदारी आयोजक आणि आंदोलनकर्ते यांची राहील याची नोंद घ्यावी.
5)सदर प्रवासामध्ये सहभागी होणारे नागरिक हे आपल्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र, लाठी, काठी, तलवार, लोखंडी गज, दगड किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
यासह प्रमुख 40 अटी
विनोद पोखरकर नावाचे वकील आज कोर्टात जातील . हायकोर्टाने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी नाकारल्यानंतर मराठा समाजाकडून कोर्टात धाव घेतली जाणार.
मस्साजोग ग्रामस्थांसह दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. आजच्या आरक्षणाच्या लढ्यात भाऊ संतोष देशमुख यांची उणीव जाणवत आहे. गरजवंत मराठ्यांच्या लढ्यात त्यांचा देखील सहभाग होता. तसंच मसाजोग गावातून नऊ पिकअपसह, सहा चारचाकी वाहनं घेऊन अंतरवाली सराटीकडे निघाल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाची मागणी घेऊन आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून मराठा समाज अंतरवली सराटीकडे निघाला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चलो मुंबईचा नारा देत हे समाज बांधव पंधरा दिवसांची शिदोरी घेऊन जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे जाणार आहेत. मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेण्याचा निर्धार या समाज बांधवांनी केलाय.
Manoj Jarange Patil & Devendra Fadnavis: मराठा आणि कुणबी एक आहेत, याचे सरकारी दस्ताऐवज सापडले आहेत. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा आरक्षणासाठी रोडमॅप वगैरे कशाला हवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) अंमलबजावणी करावी. आम्ही लगेच तीन लाख ट्रक काढतो. फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने भरुन टाकतो. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
मनोज जरांगे यांना आता डंके की चोटपर आझाद मैदानात नो एन्ट्री असेल. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
शांततापूर्ण आंदोलन करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. मात्र शहर ठप्प होईल, अशा पद्धतीने आंदोलन करता कामा नये. गणेशोत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचा पोलिसांवर मोठा ताण असून मोठ्या संख्येत जमाव आल्यास पोलिसांवरील ताण वाढेल, तसेच मोठी गैरसोय होईल, अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठामच आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आज सकाळी 10 वाजता मराठा आंदोलक आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- जालना
- Manoj Jarange Maratha Morcha LIVE: मनोज जरांगे अंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघाले, आरक्षणासाठी हजारो मराठा आंदोलक सज्ज