जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या शब्दात दम राहिला नाही, असे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर जरांगे जोरदार टीका केली आहे. "तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता नाही. नीट बोलायला पाहिजे, नाहीतर परत म्हणतो ऐकेरी बोलतो म्हणून. आमचा दम कशाला बघतो, आमचा दम बघायला गेला तर तुला शौचालयला देखील जागा सापडणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "मला तुम्ही दम शिकवू नका, तुमचं बघा यावेळी कुठे टेकतं, त्या धोरणाला लागा, राहुल गांधींनी मराठ्यांच्या नादी लागायला तुम्हाला सांगितले आहे का?, मराठा समाजावर टीका कर असे राहुल गांधी म्हणाले का?, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात की कोण आहात. तुमच्या स्वतःच्या घराचे पद नाही, विरोधी पक्षनेते पद जनतेचं पद आहे. तुला दम काढायचं कुणी सांगितलं. तू काय आमचं दम बघणार, मुंबईत पाहिले नाही का?, तुला शौचालयला देखील जाता येणार नाही. राहुल गांधी असले कशासाठी निवडतात. पक्ष कसं वाढवता येईल ते धोरण बघ, इकडे मराठ्यांच्या आंदोलनात कशासाठी बोलत आहे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


आंदोलनात बारकाईने लक्ष ठेवावे...


सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन सुरु होणार आहे. सर्वांना विनंती आहे की सकाळी साडेदहा ते एक वाजेच्या दरम्यानच आंदोलन करण्यात यावे. यावेळी शांततेत रास्ता रोको करण्यात यावेत. सध्या परीक्षा सुरु असल्याने इतर वेळेत आंदोलन करू नयेत. मात्र यावेळी सर्वांनी यावेळी सावध राहिले पाहिजे. आंदोलन करतांना चारही बाजूने व्हिडिओ शुटींग करावी. आंदोलनाला दुसरं कोणी गालबोट लावत आहे का? यासाठी शुटींग करून ठेवावी. आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ, उद्रेक करत आहेत का?, पोलिसांच्या वर्दीत घुसून कोणी काही करत आहेत का? यावर बारकाईने लक्ष ठेवावे. कारण आंतरवाली सराटीमध्ये असेच घडले होते. मराठ्यांना डाग लावण्यासाठी असे घडवले जाते. त्यामुळे रोज होणाऱ्या रास्ता रोकोची शुटींग करून ठेवण्याच्या सूचना मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना दिल्या आहेत. 


3 मार्चला जिल्ह्याच एकाच ठिकाणी आंदोलन करा...


उद्यापासून राज्यभरातील प्रत्येक गावात रास्ता रोको करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. सोबतच 3 मार्चला मात्र जिल्ह्यात एकच आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मराठा आंदोलकांनी एकत्रित येऊन एकाच ठिकाणी हे आंदोलन करायचं आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील आंदोलकांनी याठिकाणी जमावे. तर या आंदोलनाची देखील आत्तापासूनच तयारी करण्यात यावी असेही जरांगे म्हणाले आहेत. 



इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून वाहनाची तोडफोड