जालना : यंदाच्या निवडणुकीत तुमचा राजकीय सुपडा साफ होणार,  आघाड्या म्हणजे राजकीय दुकान आणि हेच दुकान आम्हाला बंद करायचं आहे असं वक्तव्य मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं. मी आताही खासदार झालो असतो, तेही फुकट, विरोधात कुणीही उमेदवार देणार नव्हतं पण मला सत्तेची हाव नाही असंही मनोज जरांगे म्हणाले. राज्य सरकारने ओबीसीतून आरक्षण द्यावं, आम्हाला निवडणूक लढवायला भाग पाडू नये असा इशारा जरांगे यांनी दिला. ते जालन्यामध्ये बोलत होते. 


निवडणुकीसाठी कागदपत्रं तयार ठेवा


मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. 14 ते 20 ऑगस्टदरम्यान सर्व 288 मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार असून निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय जरांगे पाटील 29 ऑगस्टला घेणार आहेत. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कागदपत्रं तयार ठेवावीत असंही जरांगे म्हणालेत. 


आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडू नका असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे. तर जरांगेंच्या निवडणूक लढवण्य़ाच्या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पलटवार केला. जरांगे स्वत:साठी लढणार आहेत की समाजासाठी असा सवाल हाकेंनी विचारला आहे.  


गरिबांना सत्ता दिलेली चालत नाही का? 


मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांच्या अंगावरती ओबीसींचे नेते घातलीच आहेत, मात्र मराठ्यांचे देखील घातले जात आहेत. गेल्या 70-75 वर्षांत अशी सत्ता बघितली नाही. सरकार आमच्या विरोधात बळ वापरत असेल, दंगली घडवणार असेल तर ते चुकीचं आहे. काहीजण मराठवाड्यात येऊन मला बघू असं म्हणत आहेत. अभियानाच्या माध्यमातून मला संपवण्याचे षडयंत्र सुरु आहे. सर्वांनीच मला घेरण्याचे काम सुरू केले आहे. म्हणून समाजानं एकत्रित यायचं ठरवलं आहे. गरिबांनी दिलेली सत्ता चालते तर मग गरिबांनी सत्तेत का बर जाऊ नये? एक वेळेस उलट केलं तर  चालत नाही का? फरक पडतो का? गरिबांनी एखाद्या वेळेस मालक व्हायचं नाही का?


तुमचा सुफडा साफ होईल


आरक्षण दिलं नाही तर आम्हाला पर्याय नाही. जिथे सत्तेचे केंद्र आहे तिथे आम्हाला जावंच लागणार असं मनोज जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, तुम्हाला आयुष्यात पश्चाताप होईल एवढा तुमचा राजकीय सुफडा साफ होणार आहे. सगळ्यांनी मिळून मला टार्गेट करण्याचं ठरवलं आहे. मला बाजूला करण्यासाठी हे सर्व एकत्रित आले असून मला बदनाम करण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचलंय. 


माझ्या विरोधात बोलणारे सर्व नेते सत्तेतील आहेत, सत्तेत नसलेला एकतर नेत्याचं नाव सांगा असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की, एक जण म्हणतो मी शरद पवारांचा, एक जण म्हणतो मी फडणवीसांचा आहे .त्यांचा त्यांनाच मेळच लागत नाही. हा जनतेतून उठाव आहे, सर्व जातीच्या गरिबांना माझ्यावरती विश्वास बसला आहे. 


मुंबईत येऊन तुमचा खेळ खंडोबा करणार. आमच्याकडे मतं आहेतच, फक्त माणूस उभा करायचा आहे असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.


ही बातमी वाचा: 


Manoj Jarange : बांगलादेशच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना जास्त मस्ती, बांगलादेशपासून धडा घेतला पाहिजे: मनोज जरांगे