Jalna Private School Teacher Arrested : जालना शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका नामांकित खासगी शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेत शिकणाऱ्या नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम शिक्षक विकी शिंदे याला बेड्या ठोकल्या आहेत.

Continues below advertisement

आरोपी शिक्षक विकी शिंदे सोशल मीडियाच्या माध्यमातून या विद्यार्थिनीच्या संपर्कात होता. त्याने पीडित मुलीवर मानसिक दबाव टाकून तिचे काही खासगी आणि वैयक्तिक फोटो मिळवले होते.

Jalna School Teacher Crime : फोटो व्हायरल करण्याची धमकी 

पोलीस तक्रारीतील माहितीनुसार, आरोपीने विद्यार्थिनीचे वैयक्तिक फोटो मिळवल्यानंतर तिचा छळ सुरू केला. हे खासगी फोटो सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी त्याने मुलीला दिली. या भीतीचा गैरवापर करत आणि मुलीला धमकावत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ब्लॅकमेलिंगच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

Continues below advertisement

Jalna Police Action : POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात या नराधम शिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून आरोपी शिक्षक विकी शिंदे (Vicky Shinde) याला अटक केली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून, कदीम जालना पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

ही बातमी वाचा: