Jalna News: जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. यशवंत नगर (Yashwant Nagar) भागात राहणाऱ्या एका चार वर्षीय चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात (Dog Attack) मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत चिमुकलीचे नाव परी दीपक गोस्वामी असे आहे.

Continues below advertisement

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास परी घराबाहेर गेली होती. त्याचवेळी परिसरात भटकणाऱ्या कुत्र्यांनी तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात परी गंभीर जखमी जखमी होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना (Police) माहिती दिली. तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे.

Jalna News: चिमुकलीच्या शरीरावर कुत्र्यांच्या चाव्याच्या खुणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकलीच्या शरीरावर कुत्र्यांच्या चाव्याच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळेच तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजण्यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Continues below advertisement

Jalna News: शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानंतरच परीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी पालिकेकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ranjeet Kasle Arrest: वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला लातूरमधून अटक; पोलिसांनी पकडताच केली 'पुष्पा' स्टाईल अ‍ॅक्शन

Suhas Kande: एकनाथ 'भाईं'नी सुहास 'अण्णां'ची ताकद वाढवली, नाशिकमध्ये मोठी जबाबदारी; शिवसेनेत प्रथमच 'या' पदाची निर्मिती