Jalna News : जालना जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. भजन सुरु असतानाच एका महाराजांचा मृत्यूझाला आहे. रामधन महाराज राठोड असं या महाराजांचं नाव आहे. भजन सुरु असतानाच महाराज अचानक कोसळे, यातच त्याचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Continues below advertisement

रामधन महाराज हे प्रबोधन आणि कीर्तनातून पंचक्रोशीत प्रसिद्ध

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सुरूमगाव तांडा येथे बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांचे भजन सुरु होते. यावेळीच त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज दुपारच्या सुमारास सुरु असलेल्या प्रवचन आणि भजन कार्यक्रमादरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मृत्यू झाला. आपल्या प्रबोधन आणि कीर्तनातून पंचक्रोशीत  प्रसिद्ध असलेल्या  रामधन महाराजांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

बीडच्या गेवराई शहरात कीर्तनकार महाराजांना मारहाण

बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गेवराई शहरात गावातीलच काही व्यक्तींनी एका कीर्तनकार महाराजांना लोखंडी रॉड, लाकडी दांडे, केबल वायरच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कैलास आनंदे असं या महाराजांचे नाव आहे. दरम्यान, महारादांना मारहाण केलेले सर्व चित्रण तेथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चित्रीत झाले आहे. एका कीर्तनकार महाराजांवरच जीवघेणा हल्ला झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

कैलास आनंदे हे कीर्तनकार महाराज स्वानंद सेवा गुरुकुल चालवतात

कैलास आनंदे हे कीर्तनकार महाराज स्वानंद सेवा गुरुकुल चालवतात. गावातीलच काही व्यक्तींनी अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून गावातील व्यक्तींनी महाराज आळंदीला जाताना जातेगाव रोडवर गाठून बेदम मारहाण केली. या मारहाणी मध्ये कीर्तनकार महाराज जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या घटनेमुळे कुटुंबातील सदस्य दहशतीत

या घटनेमुळे कुटुंबातील सदस्य दहशतीत असून पोलीस अधीक्षकांनी घटनेची दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मारहाण करताना हल्लेखोरांनी याचा संतोष देशमुख करून टाका असे म्हटल्याचा दावा मारहाण झालेल्या महाराजांनी केला. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Pune Crime News: संबंध तोडण्यासाठी दबाव अन् धमकी...; मुलीच्या प्रियकराने आईच्या बॉयफ्रेंडला भररस्त्यात संपवलं, पुण्यातील थरारक घटना