Gunaratna Sadavarte Jalna News : जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई आणि सुपारी फेक केली आहे. ज्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्या त्या गाडीत गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी होती. जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सदावर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शाईफेक प्रकरणावरुन गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
राज ठाकरे तुला सांगतो आजचा प्रकार तुझ्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, त्यांचा जाळण्याचा उद्देश होता का? असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. जालन्यामध्ये झालेल्या शाईफेक प्रकरणावरून सदावर्ते यांचा राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे मी तुला आव्हान करतो की तू सांग मी म्हणशील तिथे येतो वैचारिक चर्चा करु. वैचारिक चर्चेमध्ये तू हरलास तर तू उठबशा काढ आणि मी हरलो तर तर म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असं खुळं आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.
राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का?
मी डंके की चोट पर हेच म्हणेल की राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. मनोज जरांगे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. यांचे जे काही संवेदनशील आणि अप-परवृत्तिचे विचार आहेत. लोकशाहीच्या विचारानं जी माणसं प्रेरित असतात ती अशा लोकांसमोर वाकत नसतात. कारण आम्ही वाळू वाले नाही आणि टन टन टोलवाले सुद्धा नाही असं म्हणत शाही फेक केल्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आज जो काही प्रकार घडला आहे तो ज्वलनशील पदार्थ आहे, तो ऑइल आहे, त्यांचा जाळायचा उद्देश होता का? असा सवाल सदावर्ते यांनी केला. यामध्ये मनोज दरांगे आणि राज ठाकरे यांच्या अप परावर्त विचाराचे आणि अर्ध्या हळकुंडाने धुतलेले, पावशेरी पिलेले होते का? असा सवाल सदावर्ते यांनी केला. राज ठाकरे यांचे दूध खुळे विचार आणि मनोज जरांगे यांचे कुचे विचार या दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे आणि थकणारे नाहीत असेही ते म्हणाले.
मराठा मुख्यमंत्री नाही म्हणून तुम्ही जर आघाव चाळे करत असतील तर हे चालून घेतलं जाणार नाही
मराठा मुख्यमंत्री नाही म्हणून तुम्ही जर आघाव चाळे करत असतील तर हे चालून घेतलं जाणार नाही असा इशारा गुणरत्न स्वदावर्ते यांनी राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांना दिला. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री असतो, तेव्हा तेव्हा काही नालायक विचार जाती-अंधविचार कारभारी विचार तुकडे पाडण्याची भाषा करणारे हे पाणी कम चाय असून बुटाच्या धुळीसारखे आहेत. राज ठाकरे तुला सांगतो आजचा प्रकार तुझ्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. राज ठाकरे मी तुला आव्हान करतो की तू सांग मी म्हणशील तिथे येतो वैचारिक चर्चा करु असे सदावर्ते म्हणाले.