मुंबई : मराठा समाजाला (Maratha Resrvation) सरसकट कुणबी दाखले (Kunbi Certificate)  देऊ नये, जालना जिल्ह्यातील अंबडमधील ओबीसी सभेत (Jalna OBC Sabha) सर्व ओबीसी नेत्यांची मागणी केली आहे. या  सभेत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांनी छगन भुजबळांसमोर (Chhagan Bhujbal)  आरक्षणावरून शरद पवारांवर (Sharad Pawar)  अप्रत्यरित्या निशाणा साधला आहे. मराठा समाजाची वाताहत कोणी केली? तुमचा खरा शत्रू ओबीसी नाही, खरा शत्रू ओळखा, असे म्हणत भुजबळांसमोरच नाव न घेता पडळकरांनी शरद पवारांनी निशाणा साधला आहे. अंबड येथे आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षण एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. 


गोपीचंद पडळकर म्हणाले,  गरीब मराठा समाजला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा आरक्षणला  कोणाचा विरोध नाही. परंतु, 346 जाती असलेल्या ओबीसी समाजातील  जातींना धक्का न लावता आरक्षण द्या.  त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल. प्रस्थापितांना उत्तर देऊ. महाराष्ट्र समाजाची वातहात कोणी केली? ओबीसी तुमचा शत्रू नाही, तुमचा शत्रू ओळखा.  2014 साली मराठा समाजाला जसे फडणवीस यांनी आरक्षण दिले तसेच आरक्षण मराठा समाजाला द्या.


पडळकरांकडून भुजबळांची स्तुती 


17 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रच्या इतिहासात नोंद होईल. गटात आणि पक्षात पक्षात विभागलेले वाघाटे बछडे एकत्र आलेत आहेत. ओबीसींना सहज आरक्षण मिळालं नव्हतं.. मोठा संघर्ष उभा राहिला मग आरक्षण मिळाले. आरक्षणाची वाटमारी करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. ओबीसींना त्रास देण्याची भूमिका कोणी घेतली तर ओबीली समाज आता पूर्णपणे जागा झाला आहे. ओबीसीचा ढाण्या वाघ म्हणून  छगन भुजबळ आहे.  वाघ वयस्कर झाला म्हणून डरकाळी फोडायचं राहत नसतो, सिंह म्हातारा झाला म्हणून तो गवत खात नाही मांसच खात असतो, असे म्हणत पडळकरांनी भुजबळांची स्तुती केली.  


जरांगे पाटील यांच्यावर कडाडून टीका


अंबड इथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण एल्गार मेळाव्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी करण्यात आली. जरांगे पाटील यांच्यावर कडाडून टीका ओबीसी नेत्यांनी केली. जरांगेंनी सरसकट प्रमाणपत्राचा बालहट्ट सोडावा असा टोला आशिष देशमुख यांनी लगावला. तर जरांगेंनी जास्त बोलू नये, आमच्याही हाती कोयता आहे असं प्राध्यापक टी. पी. मुंडे यांनी म्हटलंय. तर मागासवर्ग आयोगाने मराठा समुहाचं सर्वेक्षण न करता मराठा जातीचं सर्वेक्षण करावं अशी मागणी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलीय.  


पाहा काय म्हणाले पडळकर