जालना : "शरीफ है हम किसी से लड़ते नहीं. पर जमाना जानता है, किसी के बाप से डरते नहीं, अशी तुफान फटकेबाजी राज्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ​ (Chhagan Bhujbal) यांनी केली. जालन्यातली वडीगोद्री येथून ते बोलत होते. 


वडीगोद्री येथे गेल्या दहा दिवसांपासून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचे उपोषण सुरु आहे. आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देत हाके आणि वाघमारे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मुंबईत काल पार पडलेल्या बैठकीनंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळाने जालन्यात जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. मंत्री छगन भुजबळ, उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर,  समीर भुजबळ, प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, संतोष गायकवाड, प्रशांत जोशी, अजय पाटणे यांचा राज्य सरकारच्या शिष्टमंडळात समावेश आहे. 


जमाना जानता है, किसी के बाप से डरते नहीं


यावेळी छगन भुजबळ यांनी उपोषणस्थळी जोरदार भाषण केले. ते म्हणाले की, आम्ही कुणालाही धमक्या देत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. आपली लढाई अजून संपलेली नाही. त्यांना दुसरे ताट द्या, आमच्या ताटातले देऊ नका. लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आम्ही पाठींबा देतो. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावे, यासाठी आरक्षण आहे. "शरीफ है हम किसी से लड़ते नहीं. पर जमाना जानता है, किसी के बाप से डरते नहीं, असे भुजबळांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी भुजबळ साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा जोरदार घोषणा दिल्या. 


त्यांची दादागिरी कधी थांबणार?


ते पुढे म्हणाले की, जातनिहाय जनगणनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पाठींबा आहे. आता विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण हवे आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पाडले. यापुढे तुम्ही सगळे एकत्र राहिलात तरच तुमचे आरक्षण टिकेल. त्यांची दादागिरी कधी थांबणार?आमच्यावरचा अन्याय कधी थांबणार? असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


भुजबळ म्हणाले, कावळ्याच्या शापाने गाय मारत नाही; आता जरांगे म्हणतात, कुणाच्या शापाने काय होतं कळेल!