Jalna : नागपूरच्या घटनेनंतर जालना पोलीस देखील सतर्क झाले असून, सोशल मीडियावर कोणतीही अफवा किंवा भडकाऊ पोस्ट पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जालना पोलिसांनी दिलाय . पोलीस प्रशासन सोशल मीडियावर बारकाईने नजर ठेवून असून कोणत्याही अक्षेपार्ह पोस्ट, किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्याना सोडणार नसल्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिला आहे. काही दिवसापूर्वी शिवजयंतीचे शिवरायांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वायरल व्हिडिओ वरून पोलिसात गुन्हा दाखल झाला होता, यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, अफवांवरती विश्वास न ठेवण्याचा आवाहनदेखील जालना पोलिसांनी केला आहे. (Nagpur Violance)
सोशल मीडियावर बारकाईने लक्ष
औरंगजेबाची कबर पाडा या मागणीसाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सोमवारी महाल परिसरात केलेल्या आंदोलनाला नागपूर मध्ये हिंसक वळण लागलं . दोन गटात झालेल्या राड्यात जमावाने तोडफोड जाळपोळ केल्याचे समोर आले . या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटले. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात शिवजयंतीदिवशी शिवरायांची प्रतिमा फाडल्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. त्यामुळे जालना प्रशासन अलर्टमोडवर आले आहे. सोशल मीडियावर बारकाईने लक्ष असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिलाय.
तणाव असलेल्या भागात पोलिसांचा रुट मार्च, आत्तापर्यंत 50 लोकांना अटक
दरम्यान, नागपुरात काल (18 मार्च) रात्रीच्या सुमारास तणाव असलेल्या भागात नागपूर पोलिसांनी रुट मार्च काढण्यात आलाय. रूट मार्च काढत अजून काही लोक अप्रिय घटना घडविण्याच्या तयारीत तर नाही ना, याची पाहणी करून अभ्यास करणार आहेत. आणि परिसरातील नागरिकांच्या पाठीशी सुरक्षेला पोलिस आहे, असा विश्वास दर्शविणार आहेत. ही गंभीर घटना आहे आणि आम्ही या घटनेला सिरीयसली घेत आहोत, यामध्ये जे लोक सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. वेगवेगळे दृश्य आणि वेगवेगळे माहिती या आधारावर कोण मास्टरमाईंड होत या आधारावर चौकशी करणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल म्हणाले.