जालना जिल्ह्यातील 40 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे. आज (20 जून) पुन्हा या प्रकरणी 7 तलाठी आणि 5 तहसील क्लार्कचे निलंबन करण्यात आलं आहे. या घोटाळ्यात 5 तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचा देखील समावेश आढळून आला आहे. त्यांचे देखील खुलासे मागवण्यात आले आहेत. दरम्यान आजच्या कारवाईनंतर या प्रकरणात आत्तापर्यंत 17 तलाठी आणि पाच तहसील कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणात आणखी 35 तलाठ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
अनुदान हडप केल्याचा प्रकार उजेडात
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी मध्ये 2022 ते 2024 या कालावधीत बोगस शेतकरी दाखवून एकाच नावावर दुबार अनुदान उकळलं गेलं, तर जमीन नसताना देखील अनुदान हडप केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या कारवाईनंतर याचे धागेदोरे तहालीदारांपर्यंत पोहचले आल्याचे दिसत असून याप्रकरणी शासन स्तरावरून फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाविषयी जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण नाथ पांचाळ यांनी माहिती दिली.
जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण नाथ पांचाळ यांनी माहिती दिलेल्या माहितीनुसार जालन्यातील 40 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात आणखी 7 तलाठी आणि 5 तहसील क्लार्कचे निलंबन करण्यात आलं आहे. आणखी 35 तलाठ्यांविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित आहे. चौकशी अहवालामध्ये 5 तहसीलदारांवर कारवाईची शिफारस करण्यात आली असून त्यांचे खुलासे मागवले आहेत. या प्रकरणात यापूर्वी 10 तलाठ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीमध्ये तत्कालिन आणि कार्यरत तहसीलदारांवर देखील ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांचे लॉगिन, पासवर्डचा गैरवापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी अतिवृष्टी आणि गारपिटचे अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 8 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या