Jalna News : राज्यभरातसध्या पावसाचा जोरवाढलाअसूनयापावसाचाफटका जालना शहरालादेखीलबसलाआहे. जालना शहरामध्ये अतिवृष्टी झाली असून अनेकांचयापावसानेमोठंनुकसानकेलंआहे. अशातचया ढगफुटीसदृश्य पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनीसोमवारी जालन्यातीलबाधितभागालाभेटदेतपरिस्थितीचाआढावाघेतला. मात्रयाभेटीदरम्यानदोनगटाततुंबळहाणामारी झाल्याचीघटनाघडलीय. आमदार अर्जुन खोतकरांच्यासमोरच दोन गटांमध्ये हि हाणामारी झाली आहे.
एकाला हटवण्यासाठी चापट मारावी लागली- अर्जुन खोतकर
मिळालेल्यामाहितीनुसार, जालना शहरामध्ये अतिवृष्टी झाली असून सध्या अनेक ठिकाणी पाणी साचल्याचेचित्रआहे. अशातच शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनीसोमवारी शहरात पाहणी दौरा करत परिस्थितीचाआढावा घेतला. यापाहणीदौऱ्यादरम्यान जालना शहरातील बस स्थानक परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याचीघटनाघडली. यात पावसाच्या पाण्यात लाकडी साहित्य वाहून गेल्यामुळे आणि जुन्या वादामुळे एकमेकांवर आरोप करत दोन गटांमध्ये मारामारी झाली. यावेळी खोतकर यांनीमध्यस्थीकरतदोन्हीगटाचीसमजूतकाढली. मात्रदोन्हीगटाकडूनकुणीहीऐकायलातयारनसल्याने वाद मिटवण्याच्या प्रयत्नामध्ये अर्जुन खोतकर यांनी एकाला चापट मारल्याचेहीपाहायलामिळाले. तर जमावाला पांगवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. त्यात एकाला हटवण्यासाठी चापट मारावी लागली, असेस्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनीयाप्रकरणावरदिलीआहे.
मुसळधार पावसाचा मोसंबी बागांना फटका, बागांना तलावाचं स्वरूप
जालना जिल्ह्यात काल मध्यरात्री सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसाचा फटका खरिपातील सोयाबीन, कपाशीसह फळबागांना देखील बसला आहे. जालन्यातील खनेपुरी परिसरातील मोसंबी भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने मोसंबी उत्पादक हवालदिल झाला आहे. खनेपुरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या मोसंबी बागांना तलावाचं स्वरूप आला आहे. जालना शहराला रात्रभर मुसळधार पावसाने झुडपून काढलं, यामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले असून, अनेकांना रात्रभर जागे राहून त्यांना घराबाहेरच आश्रय घ्यावा लागला. सर्व अन्यधान्य आणि संसारउपयोगी साहित्य पाण्यात बुडाले. शहरातील साठे नगर भागात अनेकांना रस्त्यावर रात्र जागून काढावी लागली.
महत्वाच्या बातम्या:
