​Illegal sand mining in Jalnas Godavari River: जालना: (Jalna) राज्यात सध्या अवैध वाळू उपसा (Illegala Sand Mining) प्रकरणे उघड होत आहे.  जालन्यातील अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव या गावातूनही  असाच एक  प्रकार उघडकीस आला आहे. गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वाळू माफियांनी नदीचे पात्र अक्षरशः पोखरले असून, यामुळे गोदावरी नदी पात्राच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हे प्रकरण उघड होताच स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. 

Continues below advertisement

जालनामध्ये वाळू माफियांचा कहर; गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा  सुरू (Godvari Riverbed gets damage Illegal Sand Mining)

साष्टपिंपळगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. माहितीनुसार, येथील दोन वाळू घाटांवर नियमबाह्य पद्धतीने 'चैन लोडर' यंत्रांच्या साहाय्याने दिवस-रात्र वाळू काढली जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा तिप्पट प्रमाणात वाळूचा उपसा केला जात असून, ओव्हरलोड ट्रकद्वारे ही वाळू वाहतूक केली जात आहे. या अवैध प्रकारामुळे नदीपात्राची मोठी हानी होत असतानाही, स्थानिक प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अवैध वाळू उपसा प्रकरणामुळे गोदावरी नदी पात्राचे प्रचंड नुकसान (​Illegal sand mining in Godavari River)

आता या वाळू माफियांवर वरिष्ठ स्तरावरून काही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी दोन वाळू घाटांना परवानगी आहे. मात्र, आरक्षित करून दिलेल्या जागेपेक्षा इतर ठिकाणी अवैध पद्धतीने उत्खनन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नदी पात्रात मोठे खड्डे केल्याने याचा नदी पत्राला धोका निर्माण झाला आहे. सबंधित प्रशासनाने एकदा परवानगी दिल्या नंतर त्या ठिकाणी दुर्लक्ष केल्याने नदीपात्राला धोका निर्माण झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ओव्हरलोड ट्रकमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, RTOकडून याकडे लक्ष घालण्याची मागणी सुद्धा होत आहे.

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'तुम्हाला गुड न्यूज मिळणार..' बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणकडून मोठा खुलासा; स्पर्धकांसमोर लाजला