Sushma Andhare in Jalgaon : पाच आमदार शिंदे गटात गेले म्हणून जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची शक्ती कमी झाली असं नाही, सत्ता असतानाही यांना वाय प्लस सुरक्षा घेवून फिरावं लागत आहे, यातच काय ते उत्तर आलं, अशी घणाघातील टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी जळगावात केली आहे.  


सत्ता मिळवलीली आहे ती कुटील कारस्थाने करून मिळवली आहे. या जनतेपासून संरक्षण करण्यासाठी  बंडखोरांना सुरक्षेची गरज आहे, विरोधकांच्या पाठीशी जनतेच बळ आहे. त्यामुळे विरोधकांची सुरक्षाकाडून त्यांना सुरक्षा दिली जात आहे.  आमदार किशोर पाटील व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेवरही सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे. सुषमा अंधारे तीन महिन्यांचा बाळ आहे का सुषमा अंधारे टीका करते का? यापेक्षा सुषमा अंधारे तुम्हाला जे प्रश्न विचारते त्याचे उत्तर तुमच्याकडे आहे का? असा प्रश्न अंधारे यांनी किशोर पाटील व मित्र गुलाबराव पाटील यांना विचारलं आहे.


होय मी टीका करत होते, मात्र एकदाही. आम्ही उध्दव ठाकरे यांचा हात कधी सोडलं नाही. मात्र गुलाबराव भाऊ तीस वर्ष सत्तेच्या जोरावर जो मलिदा खाल्ला तरी तुम्हाला पाझर का फुटत नाही. सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेले आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम सुरू आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे, मात्र मुबई व सिंधुदुर्ग महाराष्ट्रपासून वेगळं करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. आणि यात एकनाथ शिंदे अळीमिळी चूप करून बसले आहेत, याच वाईट वाटत आहे. यासाठीच महाराष्ट्राचं प्रभारी मुख्यमंत्रीपद त्याचा कारभार गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना द्यावा, अशी घणाघाती टीकाही अंधारे यांनी यावेळी केली..



किशोरीताई पेडणेकर असतील किंवा इतर अशा सर्वांवर दबाव तंत्र वापरण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. तुम्ही असं टार्गेट टार्गेटचा खेळ खेळत रहा, 2024 च्या निवडणुकीत जनता तुम्हाला टार्गेट दाखवल्याशिवाय राहणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या शिवसेना पक्षाबाबत सुनावनी लांबणीवर पडत असल्याने त्यावर बोलणे टाळले...सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करत नाहीये, तसा न्यायालयाचा अवमान आम्ही करणार नाही, असा टोला अंधारे यांनी लगावला.



मुंबई महापालिका निवडणूक असो की आगामी लोकसभा निवडणुका यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दबाव तंत्र वापरले जात आहे. या दबाव तंत्राच्या विरोधात प्रत्येक शिवसैनिक हा हातात मशाल घेऊन पेटून उठलेला आहे. कुठल्याही दबाव तंत्राला बळी न पडता उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी ठामपणे विरोधात उभी आहे, असे यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.