जळगाव : राज्यात 10 वी (SSC) आणि 12 वीच्या परीक्षा सुरू झाल्या असून सरकारचे कॉपीमुक्त अभियान जोरात सुरू आहे. परीक्षा केंद्रावर भरारी पथकांची कधीही धाड पडताना दिसून येते. तर, प्रत्येक जिल्ह्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त आणि कॉपीमुक्त परीक्षांसाठी चोख यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र, तरीही पेपर फुटी आणि कॉपी केल्याच्या घटना घडताना दिसून येते. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका परीक्षा केंद्रावरुन पेपर फुटल्याच्या बातम्या माध्यमांत आल्या. मात्र, बोर्डाने पेपर फुटीचा दावा फेटाळला होता. आता, जळगाव जिल्ह्यातील एक व्हिडिओ (Video viral) चांगलाच व्हायरल झाला आहे. दहावी परीक्षेच्यादरम्यान विद्यार्थ्याला शिक्षकांकडून कॉपी पुरविण्यात येत असल्याचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. त्याच आशयासह व्हिडिओ व्हायरल झाला असून शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंतही व्हिडिओ पोहोचला आहे.  इयत्ता 10 वीच्या बोर्ड परीक्षेसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही शिक्षक हे उत्तर लिहून देण्याच्या तयारीत असल्याची व्हिडिओ क्लिप सध्या जळगाव जिल्ह्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका रिक्षात बसून एक विद्यार्थी आणि दोन महिला, त्याच एक शिक्षक असल्याचे दिसून येते. या महिला पुस्तकातून उत्तर शोधून विद्यार्थ्याला एका कागदावर लिहून देत असल्याचं या क्लिपमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ कोणत्या गावाचा आहे, किंवा कॉपी करण्यासाठी ही उत्तर लिहून घेतले जात आहे का? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्राजवळील ही क्लिप असल्याचं सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.  विशेष म्हणजे रिक्षात बसलेल्या महिला चक्क प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम यांसह उत्तरे शोधून लिहित असल्याचे दिसून येते. त्यांच्या हाती नवनीतचे गाईडही पाहायला मिळते, म्हणूनच नवनीत हाती आले हो, शिक्षकासोबत कॉपी केली हो.. असाच हा प्रकार म्हणता येईल. 

Continues below advertisement

दरम्यान, ही क्लिप आपल्या मोबाईलवरही प्राप्त झाली असल्याची माहिती जळगावच्या शिक्षणाधिकारी यांनी दिली. या क्लिपबाबत आपण चौकशी करत असून, यात कोणी दोषी आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

हेही वाचा

कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी

Continues below advertisement


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI