Jalgaon zilla Dudh Sangh Election : जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज जळगाव जिल्हा दूध संघासाठी मतदान (Jalgaon zilla Dudh Sangh Election) होणार आहे. एकूण 20 जागांसाठी आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.


दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ खडसे एकटे पडले दिसत असले तरी त्यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठी ही लढाई सोपी नाही. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. त्यामुळं या निवडणुकीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.


विजय आमचाच, गिरीश महाजनांना विश्वास  


जिल्हा दूध संघाची निवडणूक आमच्यासाठी कबड्डीच आहे. मी क्रीडामंत्री असल्यानं तर दुसरीकडे गुलाबराव पाटील माझ्यासोबत असल्यानं या स्पर्धेत विजय आमचाच होईल असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे. गिरीश महाजन हे उत्तम कबड्डी खेळत असले तरी मी अंपायर आहे  असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं होते. खडसेंच्या या वक्तव्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार समाचार घेतला. अंपायर वगैरे काही नाही. त्यांनी आमच्या समोर या निवडणुकीची कबड्डी खेळा आणि जिंकून दाखवा असं आव्हान एकनाथ खडसेंना गिरीश महाजन यांनी दिले.


या निवडणुकीत विरोधकांकडून खोक्याचा वापर होईल


जिल्हा दूध संघात निवडणुकीत सत्तेचा वापर करत विरोधकांकडून खोक्याचा वापर होईल, धनाचा वापर होईल असे एकनाथ खडसे म्हणाले. विरोधकांवर आता आम्हाला बोलयचं नाही किंवा त्यांना उत्तर पण द्यायच नाही. मात्र मतदार सत्याच्या बाजूने आहेत. ते मतदानाच्या आणि निकालाच्या दिवशी दिसेलच अस म्हणत खडसेंनी विरोधकांना प्रति आव्हान दिलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Jalgaon News : एकनाथ खडसेंसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, खडसे आपलेच, त्यांना सहकार्य करा