जळगाव: नरकासुराला संपवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी घणाघाती टीका शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे नाव न घेता केली. आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मुक्ताईनगर शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती. या वेळी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. 


आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेली तीस वर्ष ज्यांनी या मतदारसंघावर राज्य केले, त्यांनी या मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आणि घराणेशाही जपली त्या नरकासुराला संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आपण आमदार म्हणून निवडून आल्यापासून सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. मात्र एकच व्यक्तीचा आपल्याला विरोध राहिला आहे. 


मागील काळात सत्तेवर असताना त्यांनी आपल्याला आणि आपल्या तीन कार्यकर्त्यांना त्यांनी  खूप त्रास दिला होता, मात्र आता घाबरण्याचं कारण नाही असं सांगत आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. यापुढे आपण विकासावर भर देणार असल्याचंही ते म्हणाले. 


खडसेसाहेब राष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढवू शकतात


गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे जळगावात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. त्यानंतर ते लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, खडसे कुटुंबीय काही पण करू शकत. त्यांच्या कुटुंबात त्यांनी ग्रामपंचायत, आमदारकी, खासदारकी, दूध संघ निवडणूक लढवली आहे. आता त्यांनी पीक संवर्धन निवडणूक लढवावी, ते राष्ट्रपती पदाची निवडणूक ही लढू शकतात.


पक्षाने आदेश दिला तर...  


पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून (Raver Lok Sabha Constituency) निवडणूक (Election Updates) लढवणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं आहे. रावेर मतदारसंघातून सध्या खडसे यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadse) या खासदार आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निडवणुकीत सून विरुद्ध सासरे अशी लढत होऊ शकते. दरम्यान 5 तारखेला झालेल्या जळगावच्या (Jalgaon News) सभेत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खडसेंना लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.  


ही बातमी वाचा: