Jalgaon :जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. जामनेरमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. जामनेर शहरातील सुपारी बाग परिसरात एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मयत तरुणाचे नाव असून तो शेतीकाम करीत होता.

Continues below advertisement

सुपारी बाग येथील निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळून आला

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा काल संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्याचा शोध कुटुंबीय व मित्रांकडून रात्रभर सुरू होता. मात्र आज सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास सुपारी बाग येथील निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी उपविभागीय रुग्णालय, जामनेर येथे आणण्यात आला.

उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज

प्राथमिक माहितीनुसार, उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कुटुंबीयांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. रितेशच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. त्याचे कुणाशीही वाद नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरु आहे.

Continues below advertisement

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची हत्या, रिक्षावाल समजून भिकाऱ्यालाच संपवलं

मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. रस्त्यावरती झोपणाऱ्या एका भिकाऱ्याची हत्या झाली आहे. रिक्षावाला समजून भिकाऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

एका रिक्षावाल्यासोबत दोन मद्यपीं केलेल्या व्यक्तीचं काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. या भांडणात रिक्षा चालकाने एकाच्या कानशिलात लगावली होती. त्याच भांडणाचा राग त्या मद्यपान केलेल्या दोघांनी आपल्या मनात ठेवला होता. आठवड्याभरानंतर रिक्षा चालकाची हत्या करायची या भावनेतून तो धारदार शस्त्र घेऊन रिक्षा स्टॅन्ड वर गेला. तिथे बाहेर झोपलेल्या एका व्यक्तीवर त्याने धारदार शस्त्राने वार केले. पुढे तपासात समोर आलं की मृत पावलेली व्यक्ती रिक्षावाला नसून रस्त्यावर झोपणारा भिकारी होता. या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे.  आरोपीला मुळात ज्या व्यक्तीला मारायचं होतं त्याला न मारता त्याने भलत्याच व्यक्तीला मारल्याची धक्कादायक घटना पवई पोलिसांच्या हद्दीत घडली  आहे.