जळगाव: अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहणाऱ्या आणि  एटी झांबरे विद्यालयाचा  विद्यार्थी तन्मय गजेंद्र पाटील याने राहत्या घरात वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

Continues below advertisement


आपल्याला अभ्यासाचा ताण सहन होत नसल्याने आपण मरायला जात असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवल्याने तन्मय पाटील यांच्या आत्महत्येचा उलगडा झाला आहे. अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने तन्मय पाटील यानी केलेली आत्महत्या ही सर्वच पालक आणि शिक्षण क्षेत्रसाठी विचार करण्याला लावणारी आणि चिंता वाढविणारी घटना असल्याने पालकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तन्मय आत्महत्या प्रकरणी जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.