Jalgaon Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्रात (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) कोणाची सत्ता येणार याचं चित्र आता स्पष्ट होत चाललंय. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातून पहिला निकाल हाती आलाय. जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांचा दणदणीत विजय झाला आहे. महाजन यांच्या विरूद्ध महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे रिंगणात होते. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत. मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे आता स्पष्ट होतंय.
महायुतीपुढं होतं मोठं आव्हान!
सध्याचे 2024 चे चित्र पाहता जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी 6 मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचं दिसून आलं. बंडखोरांना माघारी घेण्यासाठी महायुतीपुढं तसं मोठं आव्हान होतं. मात्र, अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात मंत्री गिरीश महाजन यांना अपयश आल्याचं दिसून आलं. दरम्यान, जिल्ह्यातील या 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाचं पारडं जड राहणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरत असलं तरी जामनेरमध्ये सध्यातरी कमळ फुललेलं दिसत आहे.
सलग 5 वेळी गिरीश महाजनांना उमेदवारी
महाराष्ट्रातील जामनेर विधानसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यात आणि रावेर लोकसभा मतदारसंघात येतो. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे भाजपच्या तिकिटावर सलग पाचवेळा ही जागा जिंकले असून, या निवडणुकीतही भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. या विधानसभेत ते भाजपला विजय मिळवून देऊ शकतील की जामनेरमधील विजयाचा मुकूट अन्य कोणाच्या हाती जाणार हे चित्र आता स्पष्ट झालंय. जामनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्या 2,78,356 असून, येथील एकूण लोकसंख्या 3,49,957 आहे. दिलीप खोडपे हे भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. जळगाव जिल्ह्यातील मराठा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची मतं त्यांना होती. दिलीप खोडपे यांचं गिरीश महाजनांना तगडं आव्हान होतं.
मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?
महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections/amp वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.