जळगाव : काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने (State Government) सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्ह्णून कंत्राटी पद्धतीने अधिकाऱ्यांची (Contract recruitment) भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर आता जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात थेट तहसीलदार, नायब तहसीलदार (Tahsildar) यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार असल्याची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयांकडून काढण्यात आली आहे. एकीकडे आधीच कंत्राटी पद्धतीने पदभरती करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती, अशातच जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


राज्यात विविध विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची आता कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. यात शिपायापासून ते थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वर्गवारीप्रमाणे ही भरती होणार असल्याची माहिती आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव यामधून विविध 10 कंपनीच्या माध्यमातून अनेक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector Office) कार्यालयातून तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखक संगणक चालक, शिपाई अशा पदाची भरती केली जाणार आहे. हे सर्व मानधन तत्वावर असणार असून आजपासून अर्जप्रक्रिया (Tahsildar Bharti) सुरु करण्यात आली असून 13 ऑक्टोबर पर्यंत ही भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. या कालावधीत इच्छुक व पात्र सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी, उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. 


दरम्यान जिल्हाधिकारी कार्यलयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, जळगाव जिल्हयातील लवाद तथा जिल्हाधिकारी जळगाव,  सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जळगाव, सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमळनेर, सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा, सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चाळीसगाव या कार्यालयात मासिक मानधन तत्वावर ही पदे भरली जाणार आहेत. केवळ तात्पुरत्या स्वरूपात सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. 


अशी आहे भरतीप्रक्रिया? 


सेवानिवृत्त तहसीलदार, नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपिक टंकलेखक, संगणक चालक आणि शिपाई आदी पदाची भरतीप्रक्रिया आहे. यात सेवानिवृत्त तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या 08 जागा, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपिक टंकलेखक यांच्या 15 जागा, संगणक चालक 30 जागा तर शिपाई पदाच्या 10 जागा आहेत. आजपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली असून 13 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्याचबरोबर वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Eknath Khadse : एक काम करा, मंत्रिमंडळ कंत्राटी पद्धतीने चालवायला घ्या, पाच वर्षांची गरजच काय? एकनाथ खडसेंचा सवाल