Jalgaon Gram Panchayat Election 2022: जळगाव जिल्ह्यात 140 ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यापैकी 18 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्याने रविवार 18 डिसेंबर रोजी 122 ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 122 ग्रामपंचायतीसाठी 80.24% एवढे मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेच्या तर्फे देण्यात आली आहे. सर्वाधिक मतदान जळगाव तालुक्यात 87.70 टक्के तर सर्वात कमी मतदान चोपडा तालुक्यात 73.36 टक्के झाले आहे. दरम्यान कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडलेला नाही, सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव तालुक्यातील दहा जामनेर तालुक्यातील 11 धरणगाव तालुक्यातील सात, एरंडोल तालुक्यातील पाच, पारोळा तालुक्यातील पाच, भुसावळ तालुक्यातील सहा, मुक्ताईनगर तालुक्यातील दोन, बोदवड तालुक्यातील पाच , यावल तालुक्यातील आठ , रावेर तालुक्यातील 18, अंमळनेर तालुक्यातील 20, चोपडा तालुक्यातील पाच , भडगाव तालुक्यातील सहा व चाळीसगाव तालुक्यातील 14 अशा एकूण 122 ग्रामपंचायतींसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली.
मतदानासाठी तालुका नाही आहे असे एकूण 421 मतदान केंद्राची रचना करण्यात आली होती. एकूण 2 लाख 11 हजार सात मतदारांपैकी 1 लाख 69 हजार 307 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळ ते दुपारपर्यंत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. सायंकाळी मतदानाची टक्केवारी वाढली. सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत एकूण 14.9% एवढं मतदान झालं, त्यानंतर दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत मतदानाच्या टक्केवारीचा आकडा हा 31.74 वर जाऊन पोहोचला. दुपारी दीड वाजेपर्यंत 50.90 तर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 68.58% एवढे मतदान झाले. अशाप्रकारे एकूण 122 ग्रामपंचायतीसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत 80.24% एवढे मतदान झाले आहे.
Jalgaon Gram Panchayat Election 2022: तालुका निहाय मतदानाची टक्केवारी अशी
जळगाव तालुका 87.70 टक्के, जामनेर तालुका 86.86%, धरणगाव तालुका 83.84%, एरंडोल तालुका 84.35 %, पारोळा तालुका 83.06%, भुसावळ तालुका 76.55 टक्के, मुक्ताईनगर 76.82%, बोदवड 80.55, यावल 79.67%, रावेर 77.58%, अमळनेर 79.70%, चोपडा73.36%, भडगाव 80.89% व चाळीसगाव 79.04% असे एकूण 122 ग्रामपंचायत साठी 80.24 टक्के एवढे मतदान झाले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतील पक्ष तर दुसरीकडे भाजप शिंदे गट हे रिंगणात आहेत. एकनाथ खडसे भाजपचे मंत्री गिरीश महाजन दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागले आहे. त्यामुळे कोण बाजी मारत हे पाहणं महत्वाचं असणार आहे.