Gulabrao Patil on Aaditya Thackeray : तुम्ही राजीनामा द्या, मी तुमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवायला तयार आहे, असे थेट आव्हान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना दिले. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे आता कोणतेही भांडवल शिल्लक राहिले नाही. गल्ली बोळातील नेत्यांच्या सारखी त्यांची अवस्था झाली आहे. आता केवळ म्याव म्याव करण्याचे ते आता काम करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
दोन्ही समाजांना न्याय मिळणार - गुलाबराव पाटील
उद्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) विशेष अधिवेशन होत आहे. याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्याच्या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शिक्कामोर्तब होईल. मराठा समाज आणि ओबीसी समाज (OBC Reservation) या दोघांना न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी जनतेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
शंभूराज देसाईंची आदित्य ठाकरेंवर टीका
काल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची कोपरा सभा झाली. खूपच धाडसी विधान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, असे आश्चर्यकारक विधान उबाठा गटाचे युवराज यांनी केले. आदित्य ठाकरे यांच्या चार कोपरा सभा झाल्या, ज्याला दोनशे तीनशे लोक होती. स्वतःला उबाठा गटाचे युवराज समजणाऱ्यांच्या सभेला पाचशे लोकही येत नाही. आदित्य यांना जिंकण्यासाठी दोन विधान परिषदेच्या जागा द्याव्या लागत आणि नंतर निवडणूक लढवावी लागते. त्यांनी विधानसभा लढवण्याचे चॅलेंज देणे हे हास्यास्पदच आहे, अशी टीका शंभूराज देसाईंनी केली आहे.
ठाकरे गटाची पुढील काळात आणि बिकट स्थिती होणार आहे. शिंदेची ठाणे नव्हे तर महाराष्ट्रात लोकप्रियता आहे. आदित्य ठाकरे आरोप करतात आमवस्या पौर्णिमेळा रात्री शेती करतात, मला आदित्य यांना सांगायचे तुम्ही शेती पाहायला जावे, आदित्य यांनी सवड काढून पाहा, जे शेतात कधीच जात नाही त्यांनी पाहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत भीषण अपघात!
Raj Thackeray: विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचं काहीही होणार नाही, हे केवळ झुलवतायत: राज ठाकरे